शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

फुफ्फुसाचा होतोय कोळसा ! २०२० पर्यंत केवळ सिगारेटमुळे होतील १३ टक्के मृत्यू

By admin | Updated: March 24, 2015 00:24 IST

धूम्रपान करणे हे काही लोकांसाठी स्टेटस सिंबल आहे, तर काही लोकांसाठी फॅशन मात्र या नव्या संस्कृतीचे तोटे दिसायला सुरूवात झाली आहे.

भंडारा : धूम्रपान करणे हे काही लोकांसाठी स्टेटस सिंबल आहे, तर काही लोकांसाठी फॅशन मात्र या नव्या संस्कृतीचे तोटे दिसायला सुरूवात झाली आहे. जगात सुमारे ७ टक्के लोक हे प्रतिबंधात्मक फुफ्फुसाच्या आजाराने दगावत असल्याचे समोर आले आहे. जगभरात फुफ्फुसाच्या आजाराने दगावणाऱ्या रुग्णांच्या संख्येत भारत चतुर्थ स्थानी आहे. फुफ्फुसाचा आजार होण्यापुर्वी रुग्ण आपल्या उत्पन्नाच्या सरासरी १५ टक्के खर्च धुम्रपानावर खर्च करतात आणि त्यातून होणाऱ्या आजारांवर उपचार करण्यासाठी उत्पन्नाच्या ३० टक्के रक्कम मोजावी लागते. स्वत: डॉक्टरांनी केलेल्या सर्वेतून हे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे. (प्रतिनिधी)कसली ही जीवघेणी फॅशन?एकूण धूम्रपान करणाऱ्या लोक ८० टक्के सिकगारेटचा वापर करतात तर १५ टक्के लोक विडीचा वापर करतात. ५ टक्के लोक धूम्रपानासाठी हुक्का, चिलम यासारख्या साधनांचा वापर करतात. इंडियन इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस या संस्थेच्या एका सर्वेक्षणानुसार धूम्रपानामुळे दरवर्षी ५ टक्के लोकांचा मृत्यू होतो. यात पुरूषांच्या मृत्यूशी टक्केवारी ११.१ असून ४.५ टक्के महिलांचा समावेश आहे. शिवाय २०३० मध्य धूम्रपान हे मृत्यूसाठी प्रमुख तिसरे कारण ठरणार असल्याचेही या सर्वेक्षणातून स्पष्ट करण्यात आले आहे. रफ-टफ कपडे, ट्रेंडी शूज, डोळ्यांवर गॉगल आणि ओठात सिगारेट अशी आजच्या तरूण पिढीची फॅशन झाली आहे. परंतु तीच घातक ठरत आहे.पाकिटावर लिहिलंय,पण वाचते कोण?धूम्रपान आरोग्यासाठी धोकादायक आहे, असा इशारा सिगारेटच्या पाकिटावर लिहूनही सिगारेट ओढणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. सिगारेटच्या धुरात वायू, बाष्पे व जलकणांचा समावेश असतो. धूम्रपान केल्याने फुफ्फुसात सर्वसाधारणपणे ०.५ मायक्रॉन एवढे आकारमानाने कण गोळा होतात, तर सिगारेटच्या जळत्य टोकाचे तापमान सुमारे ८८४ अंश सेल्सिअसपर्यंत असते. एक सिगरेट ओढताना सुमारे ४ हजार हानीकारक तत्वे फुफ्फुसात प्रवेश करतात. सिगारेटच्या धुरात निकोटीनसह पिरिडीन, नायट्रोजनयुक्त कार्बनी संयुगे, आयसोप्रिनॉइड संयुगे, बाप्पनशील अम्ले, टारसदृश पदार्थ, फिनॉलिकसारख्या पदार्थांचा समावेश असतो.श्वसनाच्या आजाराला कारणीभूतभारताने आरोग्य क्षेत्रात बरी प्रगती केली आहे. मागील काही वर्षांत आपण देवी, कांजण्या, पोलिओ यासारख्या मोठ्या आजारार नियंत्रण मिळविण्यात यशस्वी झालो आहोत. परंतु क्षयरोग (टीबी) या रोगावर नियंत्रण मिळविण्यात अद्याप यश आलेले आहे. या रोगामुळे दरवर्षी हजारो लोक मृत्युमुखी पडतात. सरकारी यंत्रणेवर टीबीला नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे. काही अंशी यावर नियंत्रण मिळाले असले तरी देखील संपूर्ण पणे यात यश मिळालेले नाही. भारतीयांना टीबी होण्याचे दोन मुख्य कारणात प्रदूषण व धूम्रपानाचा समावेश होतो. भारतीयांना श्वसनाचे अनेक नवे आजार होत असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.पॅसिव्ह स्मोकिंगही घातकचधूम्रपानामुळे श्वसनविकार म्हणून संबोधले जाणारे दमा, अस्थमा, सीओपीडी (क्रोनिक आॅब्सेटरी पल्मोनरी डीसिज), क्षयरोग, फुफ्फुसाचा कॅन्सर, मुखरोग, अन्ननलिकेचा कॅन्सर आदी आजार होतात. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीचे आयुष्यमान सहा ते दहा वर्षांनी कमी होते. १३ ते १५ वयाच्या २७ टक्के किशोरांमध्ये पॅसिव स्मोकिंगमुळे प्रकृतीवर ४० टक्के प्रभाव दिसून येतो. घरात धूम्रपान करणाऱ्या लोकांची संख्या लेखील बरीच मोठी आहे. एकूण धुम्रपान करणाऱ्या लोकांपैकी ७० टक्के लोक धूम्रपान करतात. यामुळे त्याच्या घरातील लोकांची प्रतिकारशक्ती कमी होत असल्याचे डॉक्टरांनी नमूद केले आहे.व्यसनापासून परावृत्त करावेजगभरात फुफ्फुसाच्या आजाराने दगावणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंगणिक वाढ होत आहे. जनजागृती होत असली त्याचा सरळ प्रभाव मनुष्याच्या मानसिकतेवर होत नाही. व्यसन हे नेहमी घातक असते, असे आपण नेहमी बोलतो. परंतु त्यापासून परावृत्त होणारी संख्या फार कमी आहे. आजची राहणीमान व ट्रेंडी फॅशनमुळेही यासारख्या आजारांना खतपाणी मिळत आहे. व्यसन होत असताना आणि ’ते’ पदार्थ शरिराला अपायकारक असतानाही मनुष्य ती कृती करीत असतो. मानवी वर्तन सुधारण्याची गरज असून बुद्धीवंतांनी याकडे आवर्जुन लक्ष द्यायला हवे.डॉ.पराग डहाके