शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

निष्ठावान कार्यकर्त्यांची राष्ट्रवादीकडे वाणवा

By admin | Updated: May 16, 2014 23:48 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे या मतदार संघावर वर्चस्व असले तरी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचे नेटवर्क टिकवून ठेवण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला फारसे यश आले नसल्याचे दिसून येते.

भंडारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे या मतदार संघावर वर्चस्व असले तरी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचे नेटवर्क टिकवून ठेवण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला फारसे यश आले नसल्याचे दिसून येते. लोकसभा निवडणुकीतील प्रफुल्ल पटेल यांच्या पराभवासाठी कार्यकर्त्यांंची ही उदासीनता बर्‍याच अंशी कारणीभूत ठरली आहे.

दोन्ही जिल्ह्यात जिल्हा परिषदेवर भाजपाचे वर्चस्व आहे. सहापैकी चार आमदार भाजप-सेनेचे आहेत. त्यामुळे ग्रामीण भागावर भाजपाची पकड असली तरी प्रफुल्ल पटेलांसारख्या हेवीवेट व्यक्तिमत्वामुळे जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांचा प्रभाव नेहमीच दिसून आला आहे. तरीही कार्यकर्त्यांवर पकड ठेवण्यात जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते कुठेतरी कमी पडल्याचे दिसून आले.

भंडार्‍यात राष्ट्रवादीचे अनेक नेते आपापल्या भागात वर्चस्व ठेवून आहेत. परंतू गोंदिया जिल्ह्यात तिरोडा वगळता कुठेही राष्ट्रवादीची पकड दिसून आली नाही.

तिरोड्यात माजी आमदार दिलीप बन्सोड यांनी घेतलेली मेहनत आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पक्षाची केलेली बांधणी यावेळी राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडली. त्यामुळेच या मतदार संघात राष्ट्रवादीला चांगली मते मिळाली. मात्र इतर तालुक्यांमध्ये बन्सोड यांच्यासारख्या लोकनेत्याचा अभाव प्रकर्षाने जाणवला.

अर्थात तिरोड्यातील प्रफुल्ल पटेलांना आघाडी मिळण्यात इतरही अनेक घटक कारणीभूत ठरले असले तरी बन्सोड यांची तालुक्यावर पकड असल्याचे यातून स्पष्टपणे दिसून आले.

त्यामुळे पुढील विधानसभेकरिता त्यांनी आपली दावेदारी यातून पक्की केल्याचे दिसून आले.

अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी हा भाजपचा गड असला तरी गोंदियात मात्र सध्याच्या घडीला काँग्रेसचे आमदार आहे. पण इथेही राष्ट्रवादीची पकड ढिली झाली असे म्हणण्यास वाव निर्माण झाला आहे.