शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; मतदानाचा टक्का घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 22:01 IST

लोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात मतदानाचा टक्का घसरल्याचे दिसत आहे. ११ एप्रिल रोजी १२ लाख ३४ हजार ८९६ म्हणजे ६८.२७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. २०१४ मध्ये ७२.२१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

ठळक मुद्दे६८.२७ टक्के मतदान : २०१४ च्या तुलनेत ३.९४ टक्के घट, सर्वाधिक साकोलीत मतदान

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात मतदानाचा टक्का घसरल्याचे दिसत आहे. ११ एप्रिल रोजी १२ लाख ३४ हजार ८९६ म्हणजे ६८.२७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. २०१४ मध्ये ७२.२१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यंदा त्यात ३.९४ टक्के घट दिसून येत आहे. मतदानाची घटलेली टक्केवारी कुणाला तारणार? यावर सध्या गावागावात चर्चा सुरू आहे.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात १८ लाख ८ हजार ७३४ मतदारांपैकी १२ लाख ३४ हजार ८९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात ६ लाख २६ हजार ७४९ पुरूष आणि ६ लाख ८ हजार १४७ मतदारांचा समावेश आहे. सर्वात कमी ६४.४१ टक्के मतदान गोंदिया विधानसभा क्षेत्रात तर सर्वाधिक ७१.६५ टक्के मतदान साकोली विधानसभा क्षेत्रात झाले.२०१४ च्या मतदानाच्या टक्केवारीच्या तुलनेत ३.९४ टक्के यंदा घट आल्याचे दिसून येत आहे. २०१४ मध्ये १६ लाख ५२ हजार २८३ मतदारांपैकी ११ लाख ९३ हजार १२५ म्हणजे ७२.२१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ३.९४ टक्के मतदानात घट दिसून येत आहे. मतदानाचा घसरलेला टक्का कुणाला फायद्याचा ठरणार, यावर सध्या गावागावात सध्या चर्चा सुरू आहे. कोणत्या विधानसभा क्षेत्रात कोणाला कसे मतदान मिळाले, यावर घमासान सुरू असून कोण जिंकणार आणि कोण हरणार याचीच चर्चा होत आहे.प्रशासनाने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेतली होती. मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती. सखी आणि आदर्श मतदान केंद्र स्थापन करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतरही मतदानाच्या टक्केवारीत अपेक्षित वाढ झाली नाही. उन्हाचा तडाख्याने मतदानात घट झाल्याचे सांगण्यात येत आहे.लोकसभा निवडणुकीत ६९.२३ टक्के पुरूषांनी तर ६७.३१ टक्के महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ९ लाख ५२ हजार पुरूष मतदारांपैकी ६ लाख २६ हजार ७३९ मतदारांनी तर ९ लाख ३ हजार ४६० महिला मतदारांपैकी ६ लाख ८ हजार १४७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.गोंदिया विधानसभाक्षेत्रात सर्वात कमी मतदानसहा विधानसभा क्षेत्रापैकी सर्वात कमी मतदान गोंदिया विधानसभा क्षेत्रात झाले. येथे ६४.४१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर सर्वाधिक मतदान साकोली विधानसभा क्षेत्रात ७१.६५ टक्के झाले. तुमसरमध्ये ७०.२६ टक्के, भंडारा ६५.६७ टक्के, अर्जुनी मोरगाव ७१.४१ टक्के, तिरोडा ६७.०८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.भंडारा जिल्ह्यात ६९.२२ तर गोंदियात ६७.६३ टक्केभंडारा जिल्ह्यातील तीन विधानसभा क्षेत्रातील सात तालुक्यात ६९.२२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर गोंदिया जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ६७.६३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गोंदिया विधानसभा क्षेत्रात लोकसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhandara-gondiya-pcभंडारा-गोंदियाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019