शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; मोदी सरकारला धडा शिकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 01:04 IST

‘अच्छे दिन’च्या नावाखाली जनतेची फसवणूक करणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारला धडा शिकविण्याची संधी आली आहे. नऊ महिन्यापुर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत भंडारा-गोंदिया मतदारसंघातील जनतेने भाजपचा पराभव करुन देशात परिवर्तनाची सुरुवात केली.

ठळक मुद्देधनंजय मुंडे : भंडारा येथील प्रचारसभेत सरकारवर टीकास्त्र

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ‘अच्छे दिन’च्या नावाखाली जनतेची फसवणूक करणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारला धडा शिकविण्याची संधी आली आहे. नऊ महिन्यापुर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत भंडारा-गोंदिया मतदारसंघातील जनतेने भाजपचा पराभव करुन देशात परिवर्तनाची सुरुवात केली. आता पुन्हा सार्वत्रिक निवडणूकीत मतदारांनी महाआघाडीचे उमेदवार नाना पंचबुध्दे यांच्या पाठीशी उभे राहून प्रफुल्ल पटेल यांची ताकद वाढवावी, असे आवाहन विधान परिषेदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी येथे केले.भंडारा शहरालगतच्या गणेशपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना पंचबुध्दे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहिर सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार मधुकर कुकडे, रामलाल चौधरी, धनंजय दलाल, माजी आमदार आनंदराव वंजारी, आमदार प्रकाश गजभिये, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, बशीर पटेल, नरेंद्र झंझाड, मनीष गणवीर, यशवंत सोनकुसरे, राजकुमार राऊत, शिशीर वंजारी, जया सोनकुसरे, प्रेम वनवे, प्यारेलाल वाघमारे, सीमा भुरे, सुनिता भुरे, गोपाल कारेमोरे आदी उपस्थित होते.धनंजय मुंडे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, देश बदल रहा है, पंरतु पाच वर्षाच्या काळात एकही बदल झालेला दिसत नाही. उलट खोटी आश्वासने व फसव्या घोषणा करुन महागाईने जनता त्रस्त झाली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या व बरोजगारी वाढली आहे, असे त्यांनी सांगितले.नऊ महिन्याआधी भंडारा-गोंदिया लोकसभेची पोटनिवडणूक झाली. त्यावेळी भाजप उमेदवाराचा पराभव करुन राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे निवडून आले. यातून देशातील जनतेला परिवर्तन हवे असल्याचे दिसून आले, असे मुंडे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी नोटबंदी, स्कील इंडिया, मेकिंग इंडिया आदींवर घनाघाती टिका केली.प्रफुल्ल पटेल यांनी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या विकासासाठी संपुर्ण आयुष्य वाहून घेतले आहे. गोसे प्रकल्पाला राष्ट्रीय मान्यता मिळवून दिली. मात्र फडणवीस आणि मोदी सरकारने राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा काढून टाकला त्याचा तुम्हाला राग कसा येत नाही, असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhandara-gondiya-pcभंडारा-गोंदियाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019