शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; मतदानाचा हक्क प्रत्येकांनी बजवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 00:56 IST

मतदान आपला अधिकार तर आहेच त्याही पेक्षा कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य प्रत्येकाने बजवावे, असे आवाहन निवडणूक निरिक्षक डॉ. पार्थ सारथी मिश्रा यांनी केले. मतदार जागृतीसाठी भंडारा शहरात आज रॅली काढण्यात आली.

ठळक मुद्देपार्थसारथी मिश्रा : भंडारा येथे मतदार जनजागृती रॅली, पथनाट्यातून मतदानाचा जागर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मतदान आपला अधिकार तर आहेच त्याही पेक्षा कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य प्रत्येकाने बजवावे, असे आवाहन निवडणूक निरिक्षक डॉ. पार्थ सारथी मिश्रा यांनी केले.मतदार जागृतीसाठी भंडारा शहरात आज रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी जिल्हा परिषद भंडारा येथून शालेय विद्यार्थ्यांची मतदार जागृती रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. या रॅलीस मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरूवात केली. रॅलीत सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ, उपजिल्हाधिकारी निवडणूक प्रमोद भुसारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा कुरसुंगे, मंजुषा ठवकर, स्वीपच्या नोडल अधिकारी कावेरी नाखले, जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर, जिल्हा आरोग्य अधिकारी प्रशांत उईके, शिक्षणाधिकारी लक्ष्मण पाच्छापूरे उपस्थित होते.लोकसभा निवडणूकीसाठी अधिकाधिकांनी मतदान करावे, यासाठी जिल्ह्यात मोठया प्रमाणात मतदार जागृती अभियान राबविण्यात येत आहे. मंगळवारला छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकूल येथे शालेय विद्यार्थ्यांची रॅली काढून पथनाट्यातून बालमनावर मतदानाचे संस्कार करुन त्याद्वारे त्यांच्या पालकांस व परिसरातील नागरिकास मतदान करण्याचा संदेश दिला. यावेळी तुमची सुविधा आमची जबाबदारी या घोष वाक्याद्वारे मतदारामध्ये जनजागृती करण्यात आली.रॅलीच्या समारोपीय कार्यक्रमात असर फाऊंडेशन भंडारा यांनी पथनाट्य सादर करुन मतदानाचे महत्व, संविधानाने दिलेल्या मतदानाच्या अधिकारामुळे घडणारे भविष्य, पोस्टकार्ड, मतदारातील मतदानविषयी अज्ञान याबाबीवर प्रकाश टाकून बालमनावर संस्कार केले.मुलामुलींना आपल्या आई-वडिल व परिसरातील नागरिकांस जाऊन याविषयी महत्व व नक्की मतदान करा,असे पटवून देण्याविषयी आवाहन करण्यात आले.भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघात शिक्षकांनी घरोघरी जावून मतदानासाठी मतदारास प्रोत्साहित करावे. त्यामुळे निश्चितच मतदानाच्या टक्केवारीत वाढ होईल, असा विश्वास सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केला. मतदान जागृती रॅली जिल्हा परिषद, राजीव गांधी चौक, मिस्किन टॅक, मुस्लीम लॉयब्ररी चौक, बस स्थानक, त्रीमूर्ती चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकूल येथे रॅलीची सांगता झाली.संचालन मुकूंद ठवकर यांनी केले. आभार अभियान शिक्षणाधिकारी काटोलकर यांनी मानले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhandara-gondiya-pcभंडारा-गोंदियाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019