शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; आता मूक प्रचारावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 01:03 IST

निवडणूक आयोगाने उमेदवारांना जाहीर प्रचारासाठी २९ मार्च ते ९ एप्रिलच्या सायंकाळपर्यंतचा कालावधी दिला होता. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी प्रचार तोफा थंडावल्या आहेत. येथूनच खऱ्याअर्थाने मूक प्रचाराला सुरुवात झाली आहे. या दोन दिवसातच खरा कस लागणार आहे.

ठळक मुद्देखेळ मनी पॉवरचा : व्होटर स्लिप वाटपाचे कार्यही जोमात

इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : निवडणूक आयोगाने उमेदवारांना जाहीर प्रचारासाठी २९ मार्च ते ९ एप्रिलच्या सायंकाळपर्यंतचा कालावधी दिला होता. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी प्रचार तोफा थंडावल्या आहेत. येथूनच खऱ्याअर्थाने मूक प्रचाराला सुरुवात झाली आहे. या दोन दिवसातच खरा कस लागणार आहे.एखाद्या विद्यार्थ्याने वर्षभर अभ्यास करून पेपरच्या एक दिवस आधी याप्रमाणे रिव्हिजन केली जाते. तशीच रिव्हीजन लोकसभेतील १४ उमेदवारांना प्रचार यंत्रणेतील सुटलेल्या भागांची करावी लागणार आहे.जाहीर प्रचाराकरिता कायदेशीरदृष्ट्या बंद असल्याने कुठलाही गाजावाजा न करता थेट शेवटची बोलणी विविध बैठकांमधून केली जाते. आता भूमिका मांडण्याऐवजी हो की नाही ते बोला, काय हवे ते सांगा, अशा शब्दात उमेदवारांकडून मन वळविण्याचा प्रयत्न करणे सुरु झाले आहे.निवडणूक जिंकण्यासाठी रिंगणात उतरलेल्या उमेदवारांकडून शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्नांची पराकाष्टा केली जाते. जाहीर प्रचारानंतरच्या मूक प्रचारालाही निवडणुकीमध्ये विशेष महत्त्व आहे. अनेक वेळा शेवटच्या दोन दिवसातच निवडणुकीचे चित्र पालटल्याची अनेक उदाहरणे आहेत. विशेषत: या दोन दिवसामध्ये अफवांचे पेव फुटण्याची भीती मोठ्या प्रमाणात राहते.या माध्यमातूनच अनेकांकडून स्वत:साठी अनुकूल असे राजकीय वातावरण तयार केले जाते. विशेषत: एखाद्या समाजाशी किंवा जातीशी जुळलेली गठ्ठा मते मिळविण्यासाठी या दिवसांमध्ये नियोजनबद्ध प्रयत्न केले जातात. मतदार याद्या पाठविणे, बुथ लावणे याचेही नियोजन उमेदवारांकडून केले जाते. या नियोजनावरच विजयाचे गणित बऱ्याचअंशी अवलंबून असते. जिवाचे रान करून जाहीर प्रचार केल्यानंतर त्याचे चीज करून घेण्याची शेवटची संधी म्हणजे मूक प्रचारासाठी मिळालेला दोन दिवसांचा कालावधी होय.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhandara-gondiya-pcभंडारा-गोंदिया