शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; भंडारा-गोंदिया मतदारसंघात ४९.२० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 19:52 IST

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदानसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत ४९.२० टक्के मतदान झाले. उन्हाची पर्वा न करता मतदार रांगा लावून मतदान करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र दिसत होते.

ठळक मुद्देमतदारांत उत्साह १४ उमेदवारांचे भाग्य मशीन बंद

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदानसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत ४९.२० टक्के मतदान झाले. उन्हाची पर्वा न करता मतदार रांगा लावून मतदान करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र दिसत होते. राष्ट्रवादीचे नाना पंचबुध्दे, भाजपाचे सुनील मेंढे यांच्यासह १४ उमेदवारांचे भाग्य मशीन बंद झाले.भंडारा-गोंदिया मतदारसंघात गुरुवारी सकाळी ७ वाजतापासून २१८४ मतदान केंद्रावर मतदानाला सुरूवात झाली. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर सकाळीपासून रांगा लागल्याचे दिसत होते. सकाळी ९ वाजेपर्यंत ८.४५ टक्के, सकाळी ११ वाजेपर्यंत २१.८८ टक्के, दुपारी १ वाजेपर्यंत ३८.१९ टक्के आणि दुपारी ३ वाजेपर्यंत ४९.२० टक्के मतदान झाले होते.राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल, वर्षा पटेल, खासदार मधुकर कुकडे, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार बाळा काशीवार, आमदार चरण वाघमारे, आमदार रामचंद्र अवसरे यांच्यासह राष्ट्रवादीचे उमेदवार नाना पंचबुध्दे तर भाजपाचे उमेदवार सुनील मेंढे यांनी मतदानाचा हक्क बजावला.जिल्ह्यातील सखी मतदान केंद्रावर सर्व कारभार महिला अधिकारी कर्मचाऱ्यांकडे होता. मोहाडी तालुक्यातील विहिरगाव येथील मतदान केंद्र तर लग्न सोहळ्यासारखे सजविण्यात आले होते. मतदान केंद्राबाहेर रांगोळी काढून प्रवेशद्वारावर बलून बांधण्यात आले होते. बोहल्यावर चढण्यापुर्वी पाच नवरदेवानी जिल्ह्यातील चार मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. वृध्दही मतदानासाठी उत्साहाने आल्याचे दिसत होते. साकोली तालुक्यातील परसोडीच्या रत्नूबाई पातोडे या वृध्द महिलेला चक्क उचलून मतदान केंद्रावर आणण्यात आले. अनेक ठिकाणी दिव्यांगांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शांतनू गोयल संपूर्ण मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. जिल्ह्यात कुठेही निवडणुकीदरम्यान अनूचित प्रकार घडला नाही.निकालाची ४२ दिवस प्रतीक्षालोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी तब्बल ४२ दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. ११ एप्रिल रोजी मतदान आटोपले असून आता निकाल २३ मे रोजी घोषीत होणार आहे. तब्बल ४२ दिवस उमेदवारांचा जीव टांगणीला लागणार आहे. या काळात मतदानाच्या टक्केवारीवरुन जयपराजयाचे गणित आखले जातील. कोण-कुठे चालला यावर तब्बल दीड महिना चर्चा होणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhandara-gondiya-pcभंडारा-गोंदियाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019