शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

बोदरा ग्रामपंचायतीला गावकऱ्यांनी ठोकले कुलूप

By admin | Updated: January 27, 2015 23:27 IST

२६ ला ग्रामपंचायत कार्यालय बोदरा येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेमध्ये अध्यक्ष सरपंच यांनी उपस्थित नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नाची समाधानकारक उत्तरे न देता निघून गेले.

साकोली : २६ ला ग्रामपंचायत कार्यालय बोदरा येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेमध्ये अध्यक्ष सरपंच यांनी उपस्थित नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नाची समाधानकारक उत्तरे न देता निघून गेले. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी चक्क ग्रामपंचायतलाच कुलूप ठोकले. या कुलूपबंद आंदोलनामुळे आज दिवसभर ग्रामपंचायतचे कामकाज बंद राहिले.बोदरा ग्रामपंचायत कार्यालयात दुपारी ग्रामसभा सुरु झाली. या ग्रामसभेला अध्यक्ष म्हणून सरपंच शांता पुरामकर होत्या. यावेळी गावकऱ्यांनी अनेक प्रश्न विचारले. यात करवसुली मागणीचे पत्र पाठविणे, यासह इतरही प्रश्नांचा समावेश होता. मात्र या प्रश्नांचे सरपंच यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाही. व त्या ग्रामसभा अर्धवट सोडून निघुन गेल्या, असा आरोप गावकऱ्याचा आहे.यानंतर उपस्थित गावकऱ्यानी वेळेवर नारायण कळपते यांची दुसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून निवड केली व ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले. जोपर्यंत आमच्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर मिळणार नाही. तोपर्यंत कुलूप उघडणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली. त्यामुळे आज दिवसभर ग्रामपंचायत कार्यालय बंद होते. सदर प्रकरणाची तक्रार पोलिस स्टेशन साकोली येथे देण्यात आली आहे.(तालुका प्रतिनिधी)