शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराज्यीय सीमेवरील पोलीस चौकी दुसऱ्या दिवशीच कुलूपबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 21:46 IST

आंतरराज्यीय वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या तपासणीसाठी तुमसर तालुक्यातील बपेरा सीमेवर करण्यात आलेले पोलीस चौकीचे उद्घाटन औटघटकेचे ठरले. पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी चौकी कुलूपबंद करण्यात आले. पोलिसांच्या रिक्त पदाचा फटका या चौकीला बसला आहे.

ठळक मुद्देरिक्त पदांचा फटका : बपेरा सीमेवर उद्घाटन ठरले औटघटकेचे

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : आंतरराज्यीय वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या तपासणीसाठी तुमसर तालुक्यातील बपेरा सीमेवर करण्यात आलेले पोलीस चौकीचे उद्घाटन औटघटकेचे ठरले. पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी चौकी कुलूपबंद करण्यात आले. पोलिसांच्या रिक्त पदाचा फटका या चौकीला बसला आहे.सिहोरा परिसरात असणाऱ्या बपेरा आंतरराज्यीय सीमेवर गणेशचतुर्थीच्या पूर्व संध्येला जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. परंतु दुसऱ्याच दिवशी खासगी घरात असणारी ही चौकी कुलूपबंद करण्याचे संकट पोलिसांवर ओढावले. सिहोरा पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचा आकडा फुगत आहे. वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देत नाहीत. परिणामी सध्या २५ पदे रिक्त आहेत. यामुळे पोलीस ठाण्याचे कामकाज प्रभावी होत आहे. तपास करताना पोलिसांची दमछाक होत आहे.अशातच आता बपेरा सीमेवर २४ तास नियुक्ती करणे कठीण जात आहे. त्यामुळे या पोलीस चौकीला कुलूपबंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट व उद्घाटनानंतरही रिक्त पदाची समस्या सुटली नाही. ही चौकी निरंतर सुरु ठेवण्यासाठी पोलिसांची नियुक्ती करणे गरजेचे आहे. त्यासाठी रिक्त पदे भरावी अशी मागणी आहे.पोलिसांची पदे रिक्त असली तरी पोलीस चौकीचे कामकाज २४ तास सुरु ठेवण्याचे प्रयत्न आहे. या कार्यात गृहरक्षकदलाचे सहकार्य घेतले जात आहे.-प्रमोद बनबले, पोलीस निरीक्षक, सिहोरा.