शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
3
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
4
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
5
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
6
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
7
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
8
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
9
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
10
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
11
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
12
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
13
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
14
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
15
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
16
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
17
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
18
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
19
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ

जगणाऱ्याला जीवन कळते, पळणाऱ्याला नाही

By admin | Updated: January 18, 2015 22:38 IST

गझल नवाज भीमराव पांचाळे यांच्या एक जखम सुगंधी या मराठी गझल गायनाच्या कार्यक्रमाने भंडारावासी मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते जिल्हा माहिती कार्यालय भंडारा व माध्यमिक शिक्षण

भंडारा : गझल नवाज भीमराव पांचाळे यांच्या एक जखम सुगंधी या मराठी गझल गायनाच्या कार्यक्रमाने भंडारावासी मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते जिल्हा माहिती कार्यालय भंडारा व माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या विद्यमाने आयोजित भंडारा गं्रथोत्सवाचे. अतिशय भावविभोर अशा गझलांनी भीमरावजींनी भंडारावासीयांच्या टाळ्यांसह त्यांच्या मनातही घर केले.‘वाचलेली ऐकलेली माणसे कुठे गेली?पुस्तकातून भेटलेली माणसे गेली कुठे?’या इलाही जमादार यांच्या गझलेने एक जखम सुगंधी या कार्यक्रमाची सुरुवात झाली. माणसाच्या सभ्यतेचा काळ सांगा कोणता, कोणत्या काळात सांगा सभ्य होती माणसे? असे प्रश्न विचारत इलाही जमादार यांनी लिहिलेल्या अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा असे शेर सादर करून भीमरावजींनी रसिकांच्या टाळ्या मिळविल्या. गझल सादर करत असताना, वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यास ते विसरले नाहीत.तोडाल वृक्ष जेव्हा ध्यानात हे असू द्या, कित्येक पाखरांचा तो आरसा असावा.असा मौलीक संदेश या निमित्ताने त्यांनी दिला. मराठी गझल सातासमुद्रापार घेऊन जाणारे भीमराव पांचाळे यांनी मराठी गझलच्या विविध छटा उलगडून दाखविलय. अकराशे वर्षापूर्वी अमिर खुसरो यांनी उर्दू आणि पारसी भाषेच्या अतिशय खुबीने वापर करून गझल लिहीली. त्याचा एक शेर उर्दू तर दुसरा पारसी भाषेत लिहिला होता. तरी सुद्धा दोन्ही भाषेचा गोडवा कायम होता. हा प्रयोग मराठी भाषेत पहिल्यांदा करण्यात आला अशी आठवण सांगून भीमरावजींनी मराठी व उर्दू भाषेचा संगम असणारी अप्रतीम गझल सादर केली.‘‘ऐ सनम आंखों को मेरी खुबसुरत साज दे, येऊनी स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे,ऐ खुदा मै चाहता हूं, हर कोई चाहे मुझे, गंध दे मजला फुलांचा हसणे निर्वाज्य देऐ खेदा इन्सान को इन्सानियत पहले सिखा, भावना तू दे त्याला आणि थोडी लाज दे’’.अमिर खुसरो नंतरच्या मराठीतील या पहिल्याच प्रयोगाला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडात दाद दिली. जानेवारीच्या गुलाबी थंडीत गझलाची ही मैफल उत्तरोत्तर फुलतच गेली. रसिकांच्या वन्समोअर प्रतिसादाने रंगलेल्या या मैफलीत भीमरावजींनी सुरेश भटांच्या तरल गझलने आणखी रंग भरले.कार्यक्रमाला सुरुवातीला जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांनी भीमराव पांचाळे व त्यांच्या सहकालाकारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मैफीलीला रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.