शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

राहतात भंडाऱ्यात; लायसन्स काढले परदेशाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:23 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क भंडारा : परदेशात दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालविण्यासाठी जिल्ह्यातील काही रहिवाशांनी ‘इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स’ (आयडीपी) काढले ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : परदेशात दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालविण्यासाठी जिल्ह्यातील काही रहिवाशांनी ‘इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स’ (आयडीपी) काढले आहे. गत दहा वर्षाच्या आकडेवारीवर नजर घातल्यास जिल्ह्यातील ६७ जणांनी आयडीपी काढले असून, राहतात भंडाऱ्यात आणि लायसन्स काढले परदेशाचे, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

उल्लेखनीय बाब, म्हणजे इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स या परवान्याची मुदत फक्त एक वर्षांसाठी असते. भारताबाहेर परदेशात वाहन चालविण्यासाठी इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स असणे अत्यावश्यक बाब आहे. याशिवाय परदेशात वाहन चालविणे म्हणजे दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते. गत दशकभराच्या आकडेवारीवर नजर घातल्यास जिल्ह्यातील ६७ नागरिकांनी इंटरनॅशनल लर्निंग लायसन्स काढले आहेत. यात २०११मध्ये सहा, २०१२मध्ये पाच, २०१३ मध्ये चार, तर २०१४ मध्ये दहा जणांनी आयडीपी काढले आहेत. सर्वात जास्त लायसन्स २०१६मध्ये म्हणजेच १४ लायसन्स भंडाराकरांनी काढली आहेत. गतवर्षी म्हणजे कोरोना काळात भंडारा जिल्ह्यातील फक्त एका नागरिकाने इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स काढले आहे. गत सहा महिन्यात कोणीही आयडीपीसाठी अर्ज दाखल केला नाही.

बॉक्स

मुदत एक वर्षाचीच

आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत (वैधता) फक्त वर्षभरासाठी असते. याचा उपयोग पुष्कळ देशांमध्ये ओळख पटविण्यासाठी केला जाऊ शकतो. आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स हा पुरावा आहे, की एखाद्या व्यक्तीने ज्या देशात तो जारी केला होता, त्या देशात वाहनचालकाचा वैध परवाना आहे. तसेच ती व्यक्ती परदेशात वाहन चालवू शकते, हेदेखील प्रमाणित होत असते. आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्समध्ये मुद्रित एकाधिक भाषा इतर देशांच्या अधिधारकांची माहिती सत्यापित करण्यास उपयुक्त ठरतात. भारतीयांना परदेशात कार भाड्याने आणि वाहन चालविण्यास मदत होईल.

बॉक्स

तुम्हालाही काढायचेच इंटरनॅशनल लायसन्स?

भारतात घरगुती रस्त्यावर वाहन चालविण्यासाठी परवान्यासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया खूप सामान्य आहे. यासाठी स्थानिक आरटीओ कार्यालयात परवान्यासाठी अर्ज करावा लागेल. यानंतर आपल्याला लेखी परीक्षा आणि ड्रायव्हिंग चाचणी द्यावी लागते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, आपल्याला सहा महिन्यांसाठी लर्निंग लायसन्स प्रदान केला जाईल आणि या कालावधीत आपल्याला कायम परवान्यासाठी अर्ज करावा लागतो. आंतरराष्ट्रीय वाहन मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रियेमधून जावे लागते. त्यानंतर लायसन्स मिळते. इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी पासपोर्ट असणे आवश्यक आहे. यासोबतच व्हिसा, येथील लायसन्स, आधार कार्ड व मेडिकल सर्टिफिकेट आवश्यक असते. लायसन्स काढण्यासाठी एक हजार रुपयांचे शुल्क अदा करावे लागते. त्यानंतरच आयडीपी लायसन्स दिले जाते.

कोट बॉक्स

इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी एक प्रक्रिया अवलंबविली जाते. ज्यांना आयडीपी आवश्यक असलेली कागदपत्रे अर्जासोबत जोडून शुल्काचा भरणा करून लायसन्स प्राप्त करता येते. अर्जामध्ये नमूद असलेल्या नियम व अटींचे पालन करणे आवश्यक आहे. या लायसन्सची वैधता वर्षभरासाठी असते. या लायसन्सचे नूतनीकरणही करता येते. यासाठी भारत सरकारने नियमात काही बदलही केले आहेत.

-राजेंद्रकुमार वर्मा,

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, भंडारा