शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांपासून 'डीवन' यादी पोहोचली नाही

By admin | Updated: March 16, 2015 00:31 IST

अन्न पुरवठा विभागातील गैरप्रकार चव्हाट्यावर येऊन तो दूर व्हावा, गरिबांना त्यांच्या हक्काचा राशन मिळावा, श्रीमंताचे नाव कमी होऊन वंचित व अति गरजूंना लाभ मिळावा, ...

करडी/पालोरा : अन्न पुरवठा विभागातील गैरप्रकार चव्हाट्यावर येऊन तो दूर व्हावा, गरिबांना त्यांच्या हक्काचा राशन मिळावा, श्रीमंताचे नाव कमी होऊन वंचित व अति गरजूंना लाभ मिळावा, दोषींवर कारवाईची दिशा निश्चित व्हावी, या उद्देशाने मोहाडी तालुक्यातील सर्व गावात चावडी वाचनाचा कार्यक्रम आखला गेला. आमदार यांच्या निर्देशानुसार गावांना तहसिल कार्यालयातून डीवन याद्या दोन महिन्यापूर्वी पाठविण्यात आल्या. मात्र पालोरा येथे त्या अजूनही पोहचल्या नाहीत.अन्न पुरवठा विभागातील गैरकारभारासंबंधी अनेक गावात आरडाओरड सुरू आहेत. गरिबांना राशन मिळत नाही मात्र श्रीमंत मालामाल आहेत, अंत्योदय याद्यांत त्यांचे नाव समाविष्ट आहेत. बऱ्याच ठिकाणी गरिबांना ७ रूपये व ९ रूपये किलोचे धान्य विकत मिळते तर श्रीमंताना ३ रूपये दराने तांदूळ व २ रूपये दराने गहू राशन दुकानातून मिळत आहे. पाच ते दहा एकरचा शेतकरी, व्यावसायीक तसेच नोकरदारही अंत्योदय यादीत समाविष्ट असल्याचे आढळून आले. गरिबांना खायला अन्न नाही मात्र श्रीमंत राशनचा अन्न खुल्या बाजारात व बाजार समित्यांमध्ये नेवून विकताना दिसतात. काही श्रीमंत मालाची उचल करीत नसल्याने त्यांचा राशन दुकानदारच परस्पर विल्हेवाट करताना दिसतो. मोहाडी अन्न पुरवठा विभागात अधाधुंद कारभार आजही पहावयास मिळतो. त्याचाच परिणाम जांभोरा येथे पहावयास मिळाला. कुरबूर करीत अन्न पुरवठा विभागाने उशिरा का होईना दोन्ही दुकाने निलंबित केली. त्या दुकानांचा कारभार हातात घेण्यासाठी सुद्धा राशन दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात लॉबिंग केली. पैसे दिले व घेतल्या गेल्याच्या चर्चासुद्धा बाहेर निघाल्या. अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांच्या याद्या ग्रामसभेतून निवडून पाठवायच्या होत्या.अन्न पुरवठा विभागातील गैरकारभार दूर व्हावा, गरजूंना व गरिबांना लाभ व्हावा या उद्देशाने आमदार महोदयांनी तालुक्यात चावडीवाचनाचा कार्यक्रम घेण्याचे निर्देश दिले. दोन महिन्याचा कालावधी लोटत असताना अजूनही पालोरा येथे याद्या पोहचल्या नाहीत आमदारांच्या निर्देशालाच महसूल प्रशासनाने हरताळ फासल्याचे याप्रकरणी दिसून येत आहे. (वार्ताहर)