शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

संगम येथे विजेचा लपंडाव

By admin | Updated: March 22, 2015 01:39 IST

संगम पुनर्वसन हे प्रकल्पबाधित गाव असून या गावचे मुजबी येथे पुनर्वसन झाले. मात्र हा गाव अनेक समस्याच्या विळख्यात अडकला असून मूलभूत सुविधापासून वंचित आहे.

भंडारा : संगम पुनर्वसन हे प्रकल्पबाधित गाव असून या गावचे मुजबी येथे पुनर्वसन झाले. मात्र हा गाव अनेक समस्याच्या विळख्यात अडकला असून मूलभूत सुविधापासून वंचित आहे. संगम येथील पथदिवे मागील दहा दिवसांपासून बंद आहेत. याबाबत सलग तीन दिवसापासून विद्युत वितरण कंपनी शहापूर सर्कलच्या तक्रार रजिस्टरमध्ये नोंद केली. मात्र अद्यापही दखल घेण्यात आली नाही.संगम येथील संपूर्ण विद्युत यंत्रणा खिळखिळी झाली असून विद्युत तारा जमिनीच्या दिशेने लोंबकळल्या आहेत. उभे असलेले खांब लोकांच्या घरावर झुकले आहेत. त्यामुळे मोठी जीवित हानी होण्याची दाट शक्यता आहे. रोहित्र खुले असून पूर्णत: तुटलेले आहे. वारंवार विद्युत तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन विद्युत तारातून जिवंत ठिणग्या पडतात. जिवंत विद्युत तारा जमिनीच्या दिशेने झुकल्यामुळे व विद्युत खांब आडवे झोपल्यामुळे वारंवार येथील विद्युत खंडीत होत असते. विद्युत कंपनी शहापूरचे कर्मचारी थातुरमातूर जोडजंतर करून तात्पुरती विज सुरू करतात. मात्र पुन्हा दोन दिवसानी विद्युत बंद होते. येथील पथदिवे तर नेहमी बंदच असतात.महावितरण कंपनीच्या वतीने प्रत्येक परिसरात एका जनमित्राची नियुक्ती केली जाते. त्या व्यक्तीकडे सदर परिसरातील विजेची संपूर्ण जबाबदारी असते. संगम पूनर्वसन मुजबी व शहापूर सर्कलमध्ये येत असूनही या सर्कलच्या कर्मचारी अधिकारी यांच्या नाकर्तेपणामुळे संगम येथील विज नेहमी बंद असते. येथील वाकलेली विद्युत खांब व झुकलेली विद्युत तारा यांची पूर्ण बांधणी करण्याची गरज असतानाही येथील कर्मचारी हेतूपुरस्पर दुर्लक्ष करून चाल ढकलपणा करीत आहेत. मात्र यांच्या वेळकाढू धोरणामुळे संगम येथील नागरिकांचे जीव धोक्यात आहे. कारण येणाऱ्या वादळ, वाऱ्यामुळे येथील वाकलेले खांब व जिवंत विद्युत तारांतून उडणाऱ्या ठिणग्यामुळे मोठा घातपात होऊ शकतो. संगम हे गाव प्रकल्पबाधीत गाव असल्यामुळे या गावाकडे कोणीही लक्ष देत नाही, अशी गावकऱ्यांची प्रशासनाप्रती नाराजी असून जीव गेल्यावरच विद्युत यंत्रणा सुरळीत होईल. तेव्हापर्यंत पथदिव्याखाली अंधार असल्याची खंत गावकरी सांगतात. (नगर प्रतिनिधी)