शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रंथालय पुरस्कारांचे निकष बदलले

By admin | Updated: September 26, 2015 00:34 IST

ग्रंथालयीन क्षेत्रात देण्यात येणारे उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालय 'सेवक' उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता या पुरस्कारांच्या अटी शर्तीमध्ये बदल करण्यात आला आहे.

भंडारा : ग्रंथालयीन क्षेत्रात देण्यात येणारे उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालय 'सेवक' उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता या पुरस्कारांच्या अटी शर्तीमध्ये बदल करण्यात आला आहे. यापुढे १0 वर्षांतून एकदाच हे पुरस्कार दिले जाणार आहेत. उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय, उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता, उत्कृष्ट ग्रंथालय सेवक हे पुरस्कार मिळविण्यासाठी आता ५0 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. यासोबतच पुरस्कार मिळविणाऱ्यांचा पुढील १0 वर्षे या पुरस्कारासाठी विचार केला जाणार नसल्याबाबत उच्च तंत्रशिक्षण मंत्रालयाने निर्णय घेतला आहे. ग्रंथालय चळवळीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रंथालयांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वोत्कृष्ट ग्रंथालयासह उत्कृष्ट काम करणाऱ्यांना ग्रंथालय सेवक कार्यकर्त्यांनाही पुरस्कार दिला जातो. त्यामध्ये अनुक्रमे डॉ. एस.आर. रंगनाथन उत्कृष्ट कार्यकर्ता सेवक ग्रंथमीत्र पुरस्काराचा समावेश आहे. मात्र, या पुरस्काराबाबतचे निकष अटी शर्ती निवड प्रक्रिया निश्चित करुन सुधारीत निर्णय घेण्यात आला आहे. अटी शर्ती गुणवत्तेच्या निकषांची पूर्तता करणाऱ्या आणि किमान ५0 टक्के गुण मिळविणारी सार्वजनिक ग्रंथालये, सेवक कार्यकर्त्यांना या पुरस्कारांसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे. ग्रंथालय सेवक कार्यकर्त्यांचे ज्या वर्षी अर्ज नसतील त्यावर्षी संबंधित पुरस्कार दिला जाणार नाही. दरम्यान या पुरस्कारांमुळे ग्रंथालयास प्रोत्साहन मिळते. यासह अधिकाधिक कार्यकर्ते तयार होऊन चळवळ वाढविण्यास मदत होत होती. या निर्णयाचा ग्रंथालयांवर परिणाम होऊ शकतो. पुरस्काराच्या वर्षात तफावत आल्याने कार्यकर्त्यांमध्ये निरूत्साहाचे वातावरण आहे. (शहर प्रतिनिधी)