कोंढा (कोसरा) : गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे काम योग्य न झाल्याने केंद्रीय चमूने त्या कामावर आक्षेप घेतल. सध्या डाव्या कालव्याचे दुरुस्तीचे काम कासवगतीने सुरू आहे. यामुळे हे काम केव्हा पूर्ण होईल याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
डाव्या
कालव्याच्या कामात मोठय़ा प्रमाणात निकृष्टपणा होत असल्याने केंद्रीय चमूने त्यावर आक्षेप घेतला. म्हणून क्राँक्रिटीकरण उखडून नव्याने क्राँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू आहे. 0 ते १0 कि.मी. पर्यंतचे काम श्रीनिवासा कंपनीला आहे. त्यांचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. कोंढा गावाजवळचे काम पूर्ण झाले आहे. सध्या आकोट, चिचाळ शेतशिवारात काम सुरू आहे. सोमनाळा शेतशिवारापासून समोर भांगदिया कंपनीला काम होते. त्या कंपनीकडून दुरुस्तीचे काम अद्याप सुरू नाही. त्यामुळे दुरुस्तीचे काम पूर्ण केव्हा होईल यावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उजवा कालव्याचे काम पूर्ण झाले. त्यामध्ये पाणी देखील सोडले आहे. त्यामुळे शेतकर्यांना रब्बी, खरीप पीक घेण्यास मदत होते आहे. पण डाव्या कालव्याचे काम केव्हा पूर्ण होईलल याची शाश्वती नाही. डावा कालव्याचे मुख्य प्रवेशद्वार जेथून पाणी येते तिथे देखील मोठा तांत्रिक बिघाड असल्याने सध्यातरी कालव्यात पाणी सोडणे अशक्य असल्याचे बोलले जात आहे. सध्या जे दुरुस्तीचे काम कासवगतीने सुरू आहे ते पाहता दहा वर्षे या कालव्यात पाणणी सोडले जावू शकत नाही असे बोलले जात आहे. अध्या तरी डावा कालवा ठिकठिकाणी नादुरुस्त अवस्थेत पाहावयास मिळते. यास जबाबदार कोण, काम कासवगतीने सुरू असून शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक शेतकरी भूमिहीन झाले. जमिनीचा मोबदला नाममात्र दिला. परिणामी डावा कालवा शेतकर्यांसाठी कर्दनकाळ ठरला आहे. (वार्ताहर)