शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

गोसेच्या डाव्या कालव्यालगतचे धान पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 23:54 IST

विदर्भातील महत्वाकांक्षी गोसे प्रकल्प शेतकºयांना वरदान ठरणार असे स्वप्न .......

ठळक मुद्देशेतकºयांचा अधिकाºयांना घेराव : नुकसानभरपाई देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी/चिचाळ/आसगाव : विदर्भातील महत्वाकांक्षी गोसे प्रकल्प शेतकºयांना वरदान ठरणार असे स्वप्न पाहणाºया शेतकºयांच्या डोळ्यात प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या निर्मितीने वाहणाºया सांडपाण्याची सुलतानी अधिकाºयांनी योग्य नियोजन न केल्याने सेंद्री खु. सेंद्री बु. कोंढा व खैरी दिवाण येथील हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली आली असून धान सडण्याच्या मार्गावर आहेत.इंदिरा सागर गोसे प्रकल्पाचा मुख्य डावा कालवा सेंद्री खुर्द, सेंद्री बु., कोंढा व खैरी दि. शेत शिवारातून गेला आहे. मात्र सदर शेत शिवारातून वाहणारे ओढे व पाणी वाहून नेणारे प्रवाह डाव्या कालव्याच्या योग्य नियोजन करण्यात नाही आल्याने सदर परिसरात ८ ते १० दिवस पाणी शेतात साचून राहतो. तर कालव्याच्या कडेने पाणी वाहून नेणारी कॅलन व सदर परिसरात कालव्याचे शाखा कालवा उपशाखा कालवा वितरिका उपवितरिका असे अनेक जाळे पसरले आहेत. मात्र शेत शिवारातील वाहुन जाणारे पाण्याची नियोजन न केल्याने हे पाणी साचून राहत आहे.गेल्या एक महिन्यापुर्वी सदर परिसरातील शेतकºयांनी व आझाद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष किशोर पंचभाई यांनी लेखी तोंडी सांगूनही शासनाने कानाडोळा केल्याने आता नुकत्याच येवून गेलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण शेतातील कोवळी रोवळी, पºहे पाच दिवसापासून पाण्याखाली आली आहे.आज ११ आॅगस्टला सकाळपासूनच आझाद शेतकरी संघत्तचे अध्यक्ष किशोर पंचभाई व शेतकरी संबंधित अधिकाºयांची चेतकाप्रमाणे वाट पाहत होती काही वेळाने अधिकारी येताच त्यांना घेराव टाकून हे तुमच्या नियोजनाअभावी पाणी वाहणाचा प्रवाह बंद झाला त्यांची योग्य विल्हेवाट लावा व झालेली नुकसान भरपाई द्या अभियंता वाघमारे यांनी मेकॅनिकलची मशीन शासनाकडे उपलब्ध नसून तुम्ही भाड्याने मशीन आणा आम्ही त्याचा मोबदला देवू मात्र शेतकरी ऐकण्यास तयार नव्हते तुम्ही वरिष्ठांना मौक्यावर बोलवा तरच यांचा विल्हेवाट लागेल ही भूमिका शेतकºयांनी बातमी लिहीपर्यंत घेतली होती.यावेळी अंकोश गिरडकर, लक्ष्मण दिघोरे, सदाशिव सावरकर, शरद मोहरकर, बंडू गिरडकर, राजीराम गायधने, चंद्रलाल गायधने, अशोक नागरीकर, दिलीप नागरीकर, निलकंठ सेलोकर, दशरत वाडीभस्मे, उमेश पंचभाई, जागेश्वर वाडीभस्मे, राजु पंचभाई, जयदेव भुरे, मुरलीधर धाबेकर व सेंद्री, कोंढा, खैरी येथील शेतकरी व आझाद शेतकरी संघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.शासनाच्या वेळकाढू धोरणाने शेतकºयांवर गेल्या कित्येक वर्षापासून ही परिस्थिती निर्माण होत आहे. सदर परिसराची चौकशी करून शेतकºयांना आर्थिक मदत द्यावी अन्यथा मोठे जनआंदोलन करण्यात येईल.-किशोर पंचभाई, अध्यक्ष, आझाद शेतकरी संघ.