शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय असेल तरच बोला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 22:58 IST

तहसीलदार गायकवाड यांचा आगळा-वेगळा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशात सर्वत्र शौचालयांचे बांधकाम व त्याच्या नियमित वापराबाबत सरकार व विविध संस्था तसेच चित्रपट आणि माध्यमांद्वारे अनेक उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती केल्या जात आहे. यात एक पाऊल पुढे जात शासकीय सेवेत असताना विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासह वैयक्तिक पातळीवरूनही आपल्याकडे येणाºया प्रत्येक नागरिकांमध्ये शौचालयांबाबत सकारात्मक भावना निर्माण व्हावी, यासाठी तहसीलदार मनीष गायकवाड यांनी आपल्या ‘नेमप्लेट’च्या जागी ‘शौचालय असेल तरच बोला’, अशी पाटी लावून जनजागृती चालविली आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरात सध्या शौचालयांबाबत जनजागृतीसाठी व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. सद्यस्थितीत गुड मॉर्निंग पथकाद्वारेही कारवाई होत असल्याने ग्रामीण भागातही हळूहळू शौचालयांची उभारणी होत आहे. शौचालय उभारण्याची गती मात्र संथ असून, हव्या त्या प्रमाणात शौचालयांची उभारणी व त्याचा नियमित वापर होत नसल्याने यास गती यावी, यासाठी तहसीलदार मनीष गायकवाड यांनी हा आगळा-वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. चिखली तालुक्यात शौचालयांची व्याप्ती जलद गतीने वाढावी व तालुका १०० टक्के हगणदरीमुक्त व्हावा, यासाठी तहसीलदार गायकवाड यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांनी आपल्या नेम प्लेटच्या जागी ‘शौचलय असेल तरच बोला’ , अशी पाटी लावली आहे. तसेच त्यांच्या अधिनस्त सर्व कार्यालय आणि अधिकाºयांनाही अशा पाट्या लावण्याबाबत सुचविले आहे. यामुळे ग्रामीण भाग हगणदरीमुक्त होण्यास मदत होईल, असा विश्वास तहसीलदार गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. सध्या चिखली तालुका व शहरात हगणदरीमुक्तीची मोहीम युद्धपातळीवर राबविली जात असून, या कामी तहसीलदार गायकवाड यांनी वैयक्तिक पातळीवरूनही पुढाकार घेतल्याने त्यांच्या या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे.