धूळपेरणी शून्य : दोन टक्के ओलीत पेरणी, कृषी केंद्र बियाणांनी सज्जपालांदूर (चौ.) : मान्सून अर्थात नैर्ऋत्य मौसमी वारे कोकणातच स्थिरावल्याने महाराष्ट्र गाठता आला नाही. मान्सूनला अपेक्षित स्थिती नसल्याने आतापर्यंत मान्सून येणे अपेक्षित होते. परंतु हवामान खाते अचूक अंदाज बांधण्यात सतत नापास होत असल्याने टीकेस पात्र ठरत आहे. पालांदूर परिसरात रोहिणी नक्षत्राने दोन-चार दिवस सायंकाळी व पहाटेला सडा शिंपल्यागत हजेरी लावली तर मृगाने थेंबही न दिल्याने शेतकरी विवंचनेत सापडला आहे. मान्सूनला जेवढा उशीर होईल तेवढी पेरणी लांबणार आहे.मान्सूनची स्थिती देशाच्या अर्थकारणाला प्रभावित करते. दोन टक्के उलाढाल एकटा मान्सूनवर हालचालीत होते. पाऊस येताच बाजाराला तेजी येते. मान्सूनच्या प्रगतीवर शेतकऱ्यांची दार मदार असल्याने चातकाप्रमाणे पावसाची प्रतिक्षा सुरू आहे. कृषी केंद्रात धान, तूर, तीळ विक्रीकरिता सज्ज आहेत. शेतकरी जमिनीचा पोत बघून पावसाचे दिवसाचा अंदाज बघून चौकशी करीत आहे. घरगुती बियाणे वापरण्याचे प्रमाण फारच कमी आहे. कृषी मंडळ पालांदूर यांनी प्रत्येक गावात जाऊन बीजप्रक्रिया मार्गदर्शन कार्यक्रम शिबिर लावून शेतकऱ्यांना महागडे बियाणेच्या तुलनेत घरचेच बियाणे वापरण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यातील १ लक्ष ८१ हेक्टरवर धान लागवड अपेक्षित असून पालांदूर कृषि मंडळांतर्गत ११८४.८५ हेक्टर पैक्ी ९९८.४५ हेक्टर नर्सरीचा अंदाज व्यक्त केला आहे.पालांदूर कृषी केंद्रात ३५ प्रकारचा धानाच्या जाती विक्रीला उपलब्ध आहेत. संकरीत वाणांनाही मागणी वाढली आहे. सरकारचा धान, तांदूळ शेतकरी ठोकळ वाणांकरिता अधिक पसंती देत स्वत: घरी खाण्यापुरताच बारीक वाण निवडताना दिसतो. ठोकळ धानात ९०९०, १००१ आरआय ६४ तर संकरीतमध्ये ६४४४, ६१२९, तेज ५२५१ या जातींना आर्थिक पसंती दिसत आहे. खाजगी कंपन्याच्या प्रचाराने शेतकरी भांबावला असून अंतिम खरेदी निर्णय कृषी केंद्र धारकाचाच मान्य करीत आहे. बियाणांचे दर मागील वर्षाच्या तुलनेत भरमार वाढले आहेत. ६०-८० रूपये प्रतिकिलो बारीक धानाचे दर असून ठोकळ धानाचे दर ३० रूपयांपर्यंत दिसतात. संकरीत धानाचे दर २७० रूपये प्रतिकिलोच्याही पुढे आहेत. संकरीत वाण प्रती एकर केवळ सह किलोच वापरायचे असल्याने इतर खर्च कमी येतो. सुधारित व ओलिताचा शेतकरी संकरीत धान लावण्याचा प्रयत्न करतो. पालांदूरजवळील वाकल येथील शेतकरी सुखराम मेश्राम यांनी ९० एकरात संकरीत बियाणे लागवडीचा मानस व्यक्त केला आहे. पावसाच्या अनिश्चित प्रवासामुळे खरिपाची पेरणी प्रभावित होणे साहजीकच आहे. वाळवाच्या खोवाळाच्या पावसाने जमिन नागंरही पेरणीकरिता सज्ज आहे. अनुभवी शेतकरी म्हणतो निसर्गाची कृपा झाल्याशिवाय पेरणी करूच नये. स्वतंत्र सिंचनातही पाण्याची पातळी आटल्याने पेरणीला घाई करणे धोक्याचे आहे. पाऊस जेवढा उशीर करेल तेवढी नर्सरीचे प्रमाण कमी होवून आपल्या क्षेत्रात वाढ होईल. धुळपेरणी पूर्वी जास्त व्हायची परंतू आता बियाणांची दरे रोजच वाढत असल्याने जोखीम न घेता पाणी आल्यानंतरच रोजच सायंकाळी आकाश ढगांनी भरून येतो पण बरसत नाही. (वार्ताहर)
मान्सूनला उशीर; पेरणी प्रभावित
By admin | Updated: June 14, 2016 00:24 IST