शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल साडेसतरा तास जड वाहनांना शहरात प्रवेशबंदी

By admin | Updated: February 1, 2015 22:49 IST

शहरातील वाढते अपघात व वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन तब्बल साडेसतरा तास जड वाहनांना शहरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ३१ जानेवारी रोजी पोलीस उपायुक्त बि.के.गावराने

अमरावती : शहरातील वाढते अपघात व वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन तब्बल साडेसतरा तास जड वाहनांना शहरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ३१ जानेवारी रोजी पोलीस उपायुक्त बि.के.गावराने यांनी ही अधिसुचना जारी केली आहे. अमरावती शहरात जड वाहने व हलकी मालवाहू वाहनांना सकाळी ६ ते रात्री ११.३० वाजेपर्यंत ये-जा करण्यास मनाई करण्यात आली आहे. केवळ रविवारी सुटी असल्यामुळे दुपारी १२ ते ५ वाजेपर्यंत वाहतुकीला शिथिलता देण्यात आली आहे. नांदगाव पेठ ते लोणी मार्गाहून पुढे ये-जा करणाऱ्या सर्व मालवाहू जड वाहनांना जुन्या बायपासवर प्रवेश करुन वाहतुकीस बंदी राहणार आहे. त्याचप्रमाणे अमरावती एमआयडीसी येथे ये-जा करणाऱ्या वाहनांना पावर हाऊस टि-पार्इंट ते बडनेरा जुनी वस्तीच्या बायपास मार्गांने बंदी राहणार आहे. नागपूर ते मुंबई, अकोला, यवतमाळ व बडनेराकडून नागपूरकडे जाणारी जड वाहने जुन्या बायपास मार्गाचा वापर न करता सुपर एक्सपे्रस हायवेचा वापर करतील अशा सूचना जारी करण्यात आल्या आहेत. तरच शहरातील वाहतुकीला आळा बसू शकेल. रात्री माल चढ-उतार केल्यावर वाहने ट्रान्सपोर्ट नगरात पार्किंगमध्ये ठेवण्याचे निर्देश दिले आहे. सूचनेचे उल्लघंन करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश देण्यात आला आहे.