शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

भूमी अभिलेख कार्यालय सलाईनवर

By admin | Updated: January 8, 2017 00:30 IST

तालुक्यातील १०८ गावाचा कारभार सांभाळणाऱ्या एकमेव भूमी अभिलेख कार्यालयातील ६ पदे रिक्त असल्याने ...

सहा पदे रिक्त : कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास मोहाडी : तालुक्यातील १०८ गावाचा कारभार सांभाळणाऱ्या एकमेव भूमी अभिलेख कार्यालयातील ६ पदे रिक्त असल्याने सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यावर अतिरिक्त भार पडत असल्याने त्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.सध्या २ भूकर मापक, १ आवक जावक लिपिक, १ पद दुरुस्ती लिपीक, १ पद परीरक्षण भूमापन व १ पद मुख्यालय सहाय्यक हे पदे रिक्त असून सध्या कार्यरत १ उपअधीक्षक व ३ शिपायासोबत ७ कर्मचारी १०८ गावातील मोजमाप सोबतच इतरही कामे सांभाळत आहेत. यात जनतेची कामे होत नसल्याने त्यांना जनतेच्या रोषाला जाऊन कधीकधी मानसिक त्रास सुद्धा सहन करावा लागत आहे. यातच कधीकधी पदाधिकाऱ्यांचे बोलणे सुद्धा या कर्मचाऱ्यांना सहन करावा लागते. करडी सर्कलला एक कार्यालय ठेवण्यात आला असून यात सोमवार व गुरुवार या दोन दिवशी त्या परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविल्या जातात. पण यात कमी वेळ मिळत असल्यामुळे जनतेचा समाधान होत नाही.उपअधीक्षक घाडगे यांना तुमसर व मोहाडी या दोन तालुक्याचा कार्यभार असल्यामुळे तेही कधी मोहाडी तर कधी तुमसर अशी कसरत करीत असतात. यामुळे जनतेला समस्या कोणाजवळ मांडाव्या हा प्रश्न पडला आहे.तालुक्यात १२ नझुल गावे असून यात मोहाडी सर्कलमध्ये मोहाडी, डोंगरगाव, आंधळगाव, जांब, कांद्री या गावाचा समावेश असून करडी सर्कलमध्ये करडी, जांभोरा, पालोरा, मुंढरी,बेटाळा, वरठी, एकलारी या गावांचा समावेश आहे. यात बेटाळा, वरठी, एकलारी यातील जनतेला करडी सर्कलला जावे लागत असल्यामुळे कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या नझुल गावातील दुकानाची तपासणी चालू असून सर्व दुकानाचे मोजमाप चालू असून यानंतर त्यावर शासन ग्रामपंचायत, नगरपंचायत व्यतिरिक्त वेगळा टॅक्स लावणार असल्याचे सांगण्यात आले. यामुळे त्वरीत रिक्त पदे भरून जनतेचा त्रास कमी करण्याची मागणी जनतेतून होत आहे. (शहर प्रतिनिधी)