शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनांसाठी जागेचा अभाव

By admin | Updated: January 25, 2015 23:07 IST

आंदोलने आंदोलनासारखी होत नाहीत, असे आपण नेहमी बोलतो. परंतु ज्या ठिकाणी आंदोलने होतात, त्या जागेची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय? ती जागा प्रशासनाने नियोजित केली आहे काय,

जिल्हा प्रशासन उदासीन : व्यवस्थेला न दिशा न दशा, अतिक्रमणाचाही विळखाइंद्रपाल कटकवार - भंडाराआंदोलने आंदोलनासारखी होत नाहीत, असे आपण नेहमी बोलतो. परंतु ज्या ठिकाणी आंदोलने होतात, त्या जागेची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय? ती जागा प्रशासनाने नियोजित केली आहे काय, असा सवाल भंडारा जिल्हा प्रशासनाला विचारल्यास याचे उत्तर मिळणार नाही. कारणही तसेच आहे. जिल्ह्याचे मुख्यालय लाभलेल्या भंडारा शहरात धरणे, मोर्चा, उपोषण करायला नियोजित अशी जागाच उपलब्ध नाही.जिल्ह्यात सात तालुके आहेत. तालुकास्थळीही आंदोलन करण्याची नियोजित अशी जागाच नाही. कुणी ग्रामपंचायतसमोर, कुणी पंचायत समितीसमोर आंदोलन करतात. अर्थात, याची रितसर परवानगी महसूल व पोलीस प्रशासनाची घेतली जाते. आंदोलन करायला नियोजित जागा नसल्याने प्रशासनाची कुंचबना होते. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या भंडारा शहरात वर्षभर विविध प्रकारची आंदोलने होतात. जिल्हा परिषद समोर, जिल्हाधिकारी कार्यालय समोरील त्रिमूर्ती चौक, पंचायत समिती कार्यालय किंवा एखादेवेळी नगरपालिकेसमोरही आंदोलन केले जाते. परंतु आजपावेतो आंदोलन करण्याची नियोजित जागा प्रशासनाने उपलब्ध करून दिली नाही अथवा त्याबाबत कुणी प्रयत्नही केले नाही. मोर्चा, धरणे, उपोषण, साखळी उपोषण, रास्ता रोको आंदोलन होत असताना याचा ताण नेहमी पोलीस प्रशासनाला सहन करावा लागतो. कायदा व सुव्यवस्थेची घडी बसविण्यास नाकी नऊ येत असते. अशावेळी स्थिती पाहण्यासारखी असते. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची गरज आहे.