शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यालयी न राहता घरभाडे भत्त्याची उचल

By admin | Updated: May 14, 2016 00:30 IST

जिल्ह्यातील ग्रामीण भागात मिनी मंत्रालय मानल्या जाणारे ग्रामपंचायत कार्यालयाचा भार सांभाळणारा शासकीय अधिकारी हा ग्रामसेवक. ...

भंडारा : जिल्ह्यातील ग्रामीण भागात मिनी मंत्रालय मानल्या जाणारे ग्रामपंचायत कार्यालयाचा भार सांभाळणारा शासकीय अधिकारी हा ग्रामसेवक. ग्रामविकास अधिकारी असतो. अशा अधिकाऱ्याने गावातच राहणे आवश्यक आहे, असे असताना कित्येक ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी गावात न राहता घर भाडेभत्ता न चुकता उचलतात. अशा अधिकाऱ्यांवर शासन फौजदारी गुन्हा दाखल का करीत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायती असून यामध्ये एकूण ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी म्हणून काम पाहतात. यातील बोटावर मोजण्याइतकेच अधिकारी गावात राहतात. इतर मात्र काही तालुक्याच्या ठिकाणी तर काही जिल्हास्तरावरुन ये-जा करतात. यामुळे कामावर उशिरा येणे व घरी लवकर निघणे तर कधी घरीच राहणे अशा वेळेस गावातील नागरिकांनी फोन करुन विचारले तर त्याला पंचायत समितीत कामानिमित्त थांबलो आहे. पंचायत समितीमधून अधिकाऱ्यांनी फोन केला तर साहेब कालचे वसुलीचे पैसे भरण्याकरिता बँकेत आलो होतो, असे उत्तर दिल्या जाते. गावातील संपूर्ण विकास साधण्याचा महत्त्वाचा दुवा हा अधिकारी असल्यामुळे गावात राहल्या तरच गावातील समस्या काय आहे, हे प्रत्यक्ष पाहिल्यानंतरच त्या अधिकाऱ्यांच्या लक्षात येईल. त्या समस्यांचे निराकरण केले जाईल व गावाचा विकास साधण्यास मदत होईल. गावमुक्कामी अधिकारी ही मोहीम शासनाला का राबवावी लागली? ग्रामीण भागातील समस्या शासनापर्यंत का पोहोचत नाही, याचे कारण ती समस्या जाणून घेण्यासाठी गावापर्यंत जाणे आवश्यक असते. असे असतानादेखील गावात नेमलेले अधिकारी गावात राहत नाहीत. यामुळे तर समस्या कधीही दूर होत नाही, यासाठी ग्रामसेवकांनी गावात राहणे अती आवश्यक आहे. या अधिकाऱ्यांनी आपण स्थानिक राहत असल्याचे पंचायत समितीमध्ये दाखविले आहे. पंचायत समितीमध्ये याकरिता एक रजिस्टरवर ग्रामसेवकांचे नाव, तो त्या गावात कुणाच्या घरी राहतो त्याचे नाव व ग्रामसेवकाची स्वत:ची सही, असा हा पंचायत समितीमध्ये स्थानिक राहत असल्याचा पुरावा आहे. मग पंचायत समितीने आपला कर्मचारी गावात राहतो की नाही, याची चौकशी करण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)