शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरी बंधाऱ्याला भगदाड

By admin | Updated: August 2, 2014 23:56 IST

शेतकऱ्यांना सिंचनाकरिता उपयोगी ठरावे याकरिता देव्हाडी शिवारात कोल्हापुरी बंधारा तयार करण्यात आला होता. परंतु निकृष्ट बांधकामाअभावी ते कुचकामी ठरले असून मागील दोन वर्षापासून

निधी पाण्यात : तुमसर-गोंदिया मार्गावर आहे बंधारातुमसर : शेतकऱ्यांना सिंचनाकरिता उपयोगी ठरावे याकरिता देव्हाडी शिवारात कोल्हापुरी बंधारा तयार करण्यात आला होता. परंतु निकृष्ट बांधकामाअभावी ते कुचकामी ठरले असून मागील दोन वर्षापासून त्याचे भगदाड दुरुस्तीचे सौजन्य दाखविण्यात येत नाही. विशेष हे की, हा मिनी कोल्हापुरी बंधारा तुमसर गोंदिया राज्य महामार्गावर आहे.एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत कृषी विभागाने तुमसर तालुक्यात मिनी कोल्हापुरी बंधारे तयार केले होते. या बंधाऱ्याला आठ ते दहा वर्षे झाली आहेत. देव्हाडी येथे तुमसर गोंदिया राज्य महामार्गावर एमआयडीसी जवळ देव्हाडी शिवारात हा बंधारा तयार करण्यात आला होता. शेतकऱ्यांकरिता हा बंधारा जीवनदायी ठरला होता. राज्य शासनाने मिनी कोल्हापुरी बंधाऱ्याची योजना यशस्वी राबविण्याचा दावा येथे फोल ठरला आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील धान्य एका पाण्याकरिता उध्वस्त होणारे या योजनेच्या माध्यमातून आपल्या धान्याचा बचाव करू शकतील हा मुळ उद्देश होता.जल संसाधन विकास महाराष्ट्रात सन १९८९ पासून सुरु झाली आहे. या योजनेतून ही महत्वपूर्ण बंधारे तयार केले जातात. एका पाण्याकरिता पीक नष्ट होत असेल त्याला वाचवणे या मुख्य उद्देशातून बंधारे तयार करण्यात आले होते. या बंधाऱ्याची विशेषत: अशी की, थोडासा पाऊस आला की बंधाऱ्यात पाणीसाठा भरतो. शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ होऊन शेतशिवारात पाण्याची मुबलकता उपयोगी ठरते. या बंधाऱ्यामुळे देव्हाडी शिवारातील सुमारे ५० ते ७० हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ होत होता. हा दगडी बंधारा असून पाणीसाठा अडविणाऱ्या भिंतीलाच मोठे भगदाड पडले आहे. या बंधाऱ्याची किंमत सुमारे ३ ते ४ लक्ष होती. भगदाड पडल्यानंतर तो भगदाड बुजविण्याचे सौजन्य संबंधित विभागाने दाखविले नाही. या मार्गावरून अनेक अधिकारी जातात. परंतु त्यांनी सुद्धा याची दखल घेतली नाही. उपयोेगी बंधारा सध्या निरुपयोगी ठरला आहे. (तालुका प्रतिनिधी)