शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

खरीप पीककर्ज वाटपात "लेटलतीफ"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2017 00:16 IST

पेरणीचा हंगाम तोंडावर येऊन ठेपलेला असतानाही शेतकऱ्यांना खरीप पीककर्ज वाटप अल्प प्रमाणातच होत आहेत.

शेतकरी चिंतातूर : उद्दिष्टपूर्तीची अपेक्षा, कर्ज वाटपात जिल्हा बँक अग्रेसर!देवानंद नंदेश्वर। लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पेरणीचा हंगाम तोंडावर येऊन ठेपलेला असतानाही शेतकऱ्यांना खरीप पीककर्ज वाटप अल्प प्रमाणातच होत आहेत. जिल्हा सहकारी बँक व बँक आॅफ इंडियाचा अपवाद वगळता उर्वरित राष्ट्रीयीकृत बँकांनी खरीप पीककर्ज वाटप फारसे गांभीर्याने घेतलेले दिसत नाही. यावर्षीच्या खरीपात ५४५.४० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. कृषिप्रधान देशातील शेतकरी अर्थव्यवस्था ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर दुसरीकडे विद्यमान "व्यवस्था" शेतकऱ्यांचा जणू "अर्थ"च काढून घेत आहे. यात निसर्गाचा लहरीपणा अधिकच भर टाकत आहे. इतरांना भरभरून देणारा, स्वत:च्या घामरुपी सिंचनातून अन्नधान्याचे उत्पादन करणारा देशाचा पोशिंदा शेतकरी स्वत: मात्र शोषित जिणे जगत असल्याची विदारक स्थिती आहे. गत चार वर्षांपासून निसर्गाने दगा दिला. त्यानंतर परतीच्या पावसानेदेखील शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला. विविध कारणांमुळे खरीप व रबीचे समाधानकारक पीक हाती आले नाही. संकटांची ही मालिका कमी म्हणून की काय, यात शेतमालाच्या अत्यल्प भावाची भर घालण्यात आली. धानाचे उत्पादन घटले; मात्र बाजारभावही यावर्षी कमी आहेत. चोहोबाजूंनी आलेल्या चक्रीवादळात अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी कोलमडून गेला. आता पुन्हा नव्या उमेदीने बँकांच्या पीककर्जरूपी कुबड्यांच्या आधारावर उभे राहण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. या प्रयत्नांना, भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँक, बँक आॅफ इंडिया, ग्रामीण बँक या बँकांचा अपवाद वगळता अन्य राष्ट्रीयीकृत बँका फारसा प्रतिसाद देत नसल्याचा अनुभव शेतकऱ्यांना येत आहे. त्यामुळे यावर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांना शेती कसण्यासाठी काटकसर करावी लागत आहे.५४५.४० कोटींचे लक्ष्यांकयंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील बँकांना ५४५ कोटी ४० लाख रुपयांचा लक्ष्यांक आहे. यामध्ये जिल्हा सहकारी बँकेला २८९.७५ कोटी, राष्ट्रीयीकृत बँकाना २०६.२५ कोटी व ग्रामीण बँकाना ४९.४० कोटी असा लक्ष्यांक आहे. कर्जमाफी चर्चेचे "साईड इफेक्ट"गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांची कर्जमाफी हा मुद्दा जिल्ह्यासह राज्यात पेटला आहे. सर्वच राजकीय पक्षांसह शेतकऱ्यांनीदेखील कर्जमाफीसाठी आवाज बुलंद केला आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशात कर्जमाफीचा निर्णय झाला. या सर्व चर्चेमुळे अनेक नियमित शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा केलेला नाही. त्यामुळे हे शेतकरी थकबाकीदार झालेत. कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.गतवर्षी उद्दिष्टपूर्तीचा अपेक्षाभंग गेल्यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ४९५ कोटी रुपये खरीप पीक कर्ज मिळण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, यातील ४०४.१६ कोटी रुपयांचेच कर्ज वाटप करण्यात आले होते. उर्वरित ९०.८४ कोटी रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेच नव्हते. यावर्षी १०० टक्के कर्ज वाटप करण्यात येणार असल्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने ठेवले आहे. शासनाचे आदेश असूनही बँकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये, यासाठी समित्या गठित करण्यात आल्या आहेत. खरीप पीक कर्ज वाटपाची प्रक्रीया सुरु आहे. आतापर्यत जिल्हा बँकेने ५० टक्केपर्यत कर्ज वाटप केलेले आहे. राष्ट्रीयकृत बँकानी जवळपास १३ टक्के कर्ज वाटप केलेले आहेत. पावसाचे आगमन होताच कर्ज वाटप कार्याला अधिक वेग असतो. कर्ज वाटपाविषयी साप्ताहिक आढावा घेतला जात आहे.-विजय बागडे, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, भंडारा.