शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

खैरीची प्रणाली दहावीत उत्तीर्ण झाली प्रथम श्रेणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 22:07 IST

ऐन परीक्षेच्या काळातच वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या पार्थिवाजवळ बसून रात्रभर अभ्यास केला. वडिलांच्या मृत्युचे दुख:ख हृदयात ठेवत दहावीची परीक्षा दिली. दोन दिवसापुर्वी लागलेल्या निकालात खैरीपटची प्रणाली मेश्राम ६४.६० टक्के गुण घेवून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. दहावीची गुणपत्रिका पाहताना वडिलांचे शब्द आठवले. अभ्यास कर, शिक्षण घेत पुढे जा...

ठळक मुद्देजिद्दीला सलाम : वडिलांच्या पार्थिवाजवळ बसून रात्रभर केला होता अभ्यास

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ऐन परीक्षेच्या काळातच वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या पार्थिवाजवळ बसून रात्रभर अभ्यास केला. वडिलांच्या मृत्युचे दुख:ख हृदयात ठेवत दहावीची परीक्षा दिली. दोन दिवसापुर्वी लागलेल्या निकालात खैरीपटची प्रणाली मेश्राम ६४.६० टक्के गुण घेवून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. दहावीची गुणपत्रिका पाहताना वडिलांचे शब्द आठवले. अभ्यास कर, शिक्षण घेत पुढे जा...प्रणाली खेमराज मेश्राम लाखांदूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात दहावीची विद्यार्थीनी. ती दहावीत असताना एसटी महामंडळात चालक असलेले वडिल खेमराज यांना कर्करोग झाला. अशा परिस्थितीत तिने खैरी पट ते लाखांदूर जाणे-येणे करत नियमित अभ्यास केला. वडिलांचा आजार वाढत गेला. नागपूर येथे उपचार सुरू झाले. इकडे दहावीच्या परीक्षेची तारीख जवळ येत होती. वडिलांचा दुर्धर आजाराने संपूर्ण कुटुंब खचले असताना प्रणालीने आपला अभ्यास सुरू ठेवला. अशातच इंग्रजीच्या आदल्या रात्री ४ मार्चला खेमराजवर काळाने झळप घातली. त्यांचे पार्थिव घरी आणण्यात आले. घरात वडिलांचे पार्थिव आणि दुसऱ्या दिवशी दहावीचा पेपर अशा अवस्थेत प्रणाली पुरती खचली होती. मात्र ज्या वडिलांनी तिला अभ्यासाचा कानमंत्र दिला त्यांचे शब्द तिच्या कानी पडत होते. बेटा, अभ्यास कर, शिक्षण घेत पुढे जा. त्यामुळेच तिने रात्रभर वडिलांच्या पार्थिवाजवळ बसून अभ्यास केला. दुसºया दिवशी परीक्षा केंद्रावर जावून इंग्रजीचा पेपर दिला. त्यानंतर वडिलांना अखेरचा निरोप दिला.दु:खाचा डोंगर झेलत दहावीचा पेपर दिल्याने गुणवत्ता घसरण्याची शासंका होती. मात्र दोन दिवसांपुर्वी लागलेल्या दहावीच्या निकालात प्रणालीने बाजी मारली. ६४.६० टक्के गुण घेवून प्रणाली उत्तीर्ण झाली. तिने प्रथम श्रेणीत मिळविल्याचे माहित होताच शाळेसह गावातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले. तिच्या कष्टाचे चीज झाले आणि वडिलांचे शब्दही तिने खरे ठरविले.प्रणाली मेश्राम ही लाखांदूर येथे शिक्षण घेत असून आता तीला वडीलांचे स्वप्न पुर्ण करायचे आहे. मात्र मोलमजुरी करणाºया आईच्या कमाईवर तिच्या शिक्षणात अडचण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी प्रणालीला शिक्षणासाठी दत्तक घ्यावे अशी अपेक्षा आहे.कौतुकाचा वर्षावप्रणालीने दहावीच्या परीक्षेत मिळविलेल्या यशाबद्दल तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.के. खोब्रागडे, आर.एम. मुळे, संजय प्रधान, एस.डब्ल्यु. दिवटे यांनी तिचे कौतुक केले. पुढील शिक्षणासाठी तिला धीर देत सर्वच जण तुझ्या पाठीशी आहे, असे सांगितले.