शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव एमआयडीसीला २०२० पर्यंत मिळणार 'जिगांव'चे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 15:45 IST

लवकरच जिगांवचे पाणी खामगाव एमआयडीसीला मिळणार असल्याचे संकेत मिळाले आहे.

ठळक मुद्देज्ञानगंगा प्रकल्पातून खामगाव एमआयडीसीला पाणीपुरवठा होतो. धरणात मुळातच पाणी कमी असल्याने खामगाव एमआयडीसीची पाण्याची भूख हा प्रकल्प भागवू शकत नाही. खामगाव एमआयडीसी परिसरातून जिगांव प्रकल्पातून येणारी मुख्य पाईपलाईन गेलेली आहे.

- गजानन राऊतखामगाव : बुलडाणा जिल्ह्यामध्ये मागील तीन वर्षांपासून अत्यल्प पाऊस येत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. भर पावसाळयात सुध्दा टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. उद्योगांना तर नेहमीच पाण्याची चणचण भासवते. त्यामुळे नवीन उद्योग उभारणीस येत नाही. परंतु आता हा प्रश्न कायमचा निकाली लागणार असून लवकरच जिगांवचे पाणी खामगाव एमआयडीसीला मिळणार असल्याचे संकेत मिळाले आहे. यासाठी प्रशासकीय लेवलवर जोरदार हालचाली सुरु आहेत.बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात मोठे औद्योगिक क्षेत्र खामगावला आहे. आधीचे २६७ हेक्टर आणि आता नव्याने २५६ हेक्टर क्षेत्र खामगाव एमआयडीसीला उपलब्ध होणार आहे. या एमआयडीसीमध्ये २०० हून अधिक कारखाने आहेत. हजारो कामगार याठिकाणी आपली उपजिविका भागवतात. परंतु अत्यल्प पावसामुळे एमआयडीसीला होणारा पाणीपुरवठा हा नेहमी खंडीत होत राहतो. त्यामुळे बरेच उद्योग बंद राहतात. पर्यायाने उद्योजकांवर तर संक्रांत येतेच त्याचबरोबर कामगारांवर सुध्दा उपासमारीची पाळी येत असते. ज्ञानगंगा प्रकल्पातून खामगाव एमआयडीसीला पाणीपुरवठा होतो. परंतु या धरणात मुळातच पाणी कमी असल्याने खामगाव एमआयडीसीची पाण्याची भूख हा प्रकल्प भागवू शकत नाही. हे गोष्ट लक्षात घेता प्रशासकीय पातळीवर जिगांव प्रकल्पाचे पाणी जर खामगाव एमआयडीसीला घेता आले तर याठिकाणचा पाणीप्रश्न नेहमी सूटू शकतो असे प्रथमदर्शनी लक्षात आले आणि तशा हालचाली सुरु झाल्या. खामगाव एमआयडीसी परिसरातून जिगांव प्रकल्पातून येणारी मुख्य पाईपलाईन गेलेली आहे. त्यामुळे याठिकाणी पाणीपुरवठा करणे सोपे होणार आहे. ही गोष्ट लक्षात घेता एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाºयांनी बैठक घेऊन प्रोजेक्ट रिपोर्ट सादर करण्याचे निश्चित केले असून लवकरच ही खुशखबर व्यापाºयांना आणि उद्योजकांना तसेच परिसरातील नवीन उद्योग सुरु करणाºया युवकांना मिळणार आहे. या विषयी खामगाव एमआयडीसीचे उपविभागीय अभियंता रवींद्र खरात यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.  खामगाव एमआयडीसीची गरज लक्षात घेता. वरिष्ठ पातळीवर जिगांव प्रकल्पाचे पाणी मिळण्यासाठी हालचाली सुरु असून, लवकरच याबाबतीत निर्णय होणार आहे. त्यामुळे खामगाव एमआयडीसीचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी सुटणार आहे.-  रवींद्र खरात, उपविभागीय अभियंता, एमआयडीसी खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावMIDCएमआयडीसी