शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याची प्रतिमा अबाधित ठेवा

By admin | Updated: March 26, 2015 00:28 IST

सोशल मिडिया ही दुधारी तलवार आहे. त्याचे चांगले व वाईट दोन्ही फायदे आहेत.

भंडारा : सोशल मिडिया ही दुधारी तलवार आहे. त्याचे चांगले व वाईट दोन्ही फायदे आहेत. त्यामुळे या माध्यमाचा वापर जपुन केला पाहिजे. जिल्ह्याची प्रतिमा डागाळली जाईल, असे कोणतेही कृत्य सोशल मिडियाच्या वापरातून करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी केले.सण-उत्सव यांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कयम राहावी म्हणून जातीय सलोखा समितीची बैठक पोलीस बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना डॉ. खोडे बोलत होत्या. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक कैलास कणसे, अप्पर पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, कार्यकारी अभियंता गाणार, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके, तहसिलदार सुशांत बनसोडे, जिल्हा परिषद सदस्य ज्योती निंबोरकर, महेंद्र गडकरी, डॉ. जुल्फी शेख, राम चाचेर उपस्थित होते. जिल्हा पोलीस अधीक्षक व शिक्षण विभाग यांच्या माध्यमातून माध्यमिक व उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी सोशल मिडियांचा वापराबाबत जनजागृती करण्यात येईल. मात्र पालकांनी सुद्धा याबाबत काळजी घेण्याची गरज आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करताना समाजाला, राज्याला आणि राष्ट्राला धोका होणार नाही, अशा पद्धतीने करायला पाहिजे. प्रत्येकाने स्वत:च्या धर्माला चांगले समजावे पण दुसऱ्याच्या धर्माला व जातीला कमी लेखू नका. प्रसारमाध्यांनी सुद्धा घटनेच्या दोन्ही बाजू द्याव्यात, शांतता राखण्यासाठी प्रशासनाने काय काम केले ते सुद्धा लोकांपर्यंत पोहचायला हवे, असे मत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.जिल्हा पोलीस अधीक्षक कणसे म्हणाले, माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६ अ हे रद्द केल्याने सोशल मिडियाचा वापर करणाऱ्यांना खुप आनंद झाला असेल. पण या स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार होत नाही त्याला बंधन घातली गेली पाहिजेत. त्यासाठी आय.पी.सी. अ‍ॅक्ट आहे. या कायद्यानुसार सुद्धा संबंधितावर कार्यवाही करता येवू शकते. जिल्ह्याची ओळख खैरलांजी, मुरमाडी, अशी झाली आहे. ती बदलण्याचे आवाहन आपल्यासमोर असताना आपण बेजबाबदारपणे योग्य ठरणार नाही, असेही ते म्हणाले. अप्पर पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर यांनी जातीय सलोखा समितीची भूमिका विषद केली तर उपविभागीय अधिकारी हिम्मत जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. (प्रतिनिधी)समितीच्या सदस्यांनी मांडले विचारबैठकीत राम चाचेरे यांनी सोशल मिडियावर विस्फोटक मजकुर टाकू नये. पालकांनी आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवावे आणि मिरवणुकांमध्ये डी.जे. ऐवजी ढोल ताशाचा वापर करावा अशा सूचना केल्यात. प्रा. डॉ. जुल्फी शेख यांनी सायबर क्राईम विषयी तरूणांना संस्कार देण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले. हाजी अब्दुल गफ्फार आकबानी यांनी दुसऱ्यांच्या जाती, धर्माचा सन्मान करायला हवा. इतरांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. तसेच कायदा हातात न घेता पोलिसांची मदत घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. महेंद्र गडकरी, ज्योती निंभोरकर यांनीही सुचना केल्यात.