शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
3
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
4
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
5
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
6
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
7
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
8
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
9
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
10
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
11
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
12
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
13
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
14
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
15
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
16
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
17
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
18
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
19
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
20
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव

‘ई-लर्निंग’साठी काशिवारांचा सर्वाधिक निधी

By admin | Updated: March 5, 2017 00:28 IST

शीर्षक वाचून आश्चर्य वाटले असेल, परंतु हे खरे आहे. आपल्या क्षेत्राच्या विकासासाठी स्थानिक विकास निधीतून कामे प्रत्येकच लोकप्रतिनिधी करीत असतात.

९१ शाळांमधून ‘डिजीटल’ शिक्षण : आमदार निधीतून दिला ७६ लाख रूपयांचा निधीप्रशांत देसाई भंडाराशीर्षक वाचून आश्चर्य वाटले असेल, परंतु हे खरे आहे. आपल्या क्षेत्राच्या विकासासाठी स्थानिक विकास निधीतून कामे प्रत्येकच लोकप्रतिनिधी करीत असतात. परंतु त्यापलिकडे जाऊन साकोलीचे आमदार बाळा काशिवार यांनी जिल्हा परिषद शाळांचा चेहरा बदलविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या पुढाकारामुळे साकोली क्षेत्रातील ९१ शाळांमधील विद्यार्थ्यांना ‘ई-लर्निंग’चे शिक्षण मिळणार आहे. भंडारा जिल्ह्यात चार आमदार असून त्यापैकी काशिवार यांनीच शाळा डिजीटल करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आ.बाळा काशिवार यांनी त्यांच्या आमदार निधीतून या शाळा डिजीटल केलेल्या आहेत. यासाठी त्यांनी ७५ लाख ९२ हजार ९९९ रूपये जिल्हा परिषद शिक्षण विभागाला दिले. यातून ७९ शाळा डिजीटल झालेल्या असून उर्वरित १५ शाळा होणार आहेत. आमदार बाळा काशिवार यांनी जिल्हा परिषद शाळांसाठी निधी देऊन विद्यार्थ्यांना ई-लर्निंगचे शिक्षण देण्यासाठी चालविलेले प्रयत्न वाखाण्यासारखे आहे. आ.काशिवार यांनी त्यांच्या क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवीच्या जिल्हा परिषद शाळांवर सन २०१४-१५, २०१५-१६ आणि २०१६-१७ या तीन वर्षात हा निधी खर्च केला असून यातून आता विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षण मिळत आहे. तुमसरचे आमदार चरण वाघमारे, भंडाराचे आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे हे त्यांच्या निधीतून शाळा डिजीटल करण्यासाठी जिल्हा परिषदेला निधी दिलेला नाही. आ.बाळा काशिवार यांनी जिल्हा परिषद शाळा डिजीटल करण्यासाठी लाखांदूर तालुक्यातील ८५ शाळांपैकी ३० शाळा, लाखनी तालुक्यात ८९ शाळांपैकी १९ शाळा तर साकोली तालुक्यात ९६ शाळांपैकी ३० शाळांमध्ये डिजीटल प्रोजेक्टर लावण्यासाठी निधी दिला आहे. साकोली विधानसभा क्षेत्रातील लाखांदूर, लाखनी व साकोली येथील १७९ जिल्हा परिषद शाळांपैकी तब्बल ७९ शाळांमध्ये डिजीटल क्लॉसरूम तयार करण्यात आले आहे. यातून विद्यार्थ्यांना ई-लर्निंगचा पाठ्यक्रम शिकविण्यात येत आहे. उर्वरित १५ शाळांच्या यादीला अंतिम स्वरूप मिळाले असून येत्या काही दिवसात या शाळांमध्ये ई-लर्निंग शिक्षण मिळणार आहे. आ.बाळा काशिवार यांनी जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक पध्दतीने शिक्षण मिळावे यासाठी चालविलेली ‘डिजीटल क्लॉसरूम’ची ही धडपड विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाप्रती गोडी निर्माण करणारी आहे. आमदारांचा हा उपक्रम जिल्ह्यासह राज्यातील आमदार, जिल्हा परिषद सदस्यांनी स्वीकारून त्यांच्या क्षेत्रातील शाळा डिजीटल करण्यावर भर दिल्यास जिल्हा परिषद शाळांना भरभराटी येण्यात वेळ लागणार नाही. तीन टप्प्यात दिला ७६ लाखांचा निधीआ.काशिवार यांनी २०१४-१५ मध्ये पहिल्या टप्प्यात २० लाखांचा निधी दिला. यात २२ शाळा डिजीटल करण्यात आल्या. १५-१६ मध्ये दुसऱ्या टप्प्यात १२ लाख ९३ हजारांचा निधी दिला. यात १३ शाळा डिजीटल केल्यात. २०१६-१७ मध्ये तिसऱ्या टप्प्यात ४२ लाख ९९ हजार ९९९ रूपयांचा निधी दिला. यात ४६ शाळा डिजीटल करण्यात आल्या. यातील ११ लाख ४३ हजारांचा निधी शिल्लक असून १५ शाळा डिजीटल करण्यात येणार आहे.खाजगी शाळांमध्ये सर्व सुविधायुक्त शिक्षण दिले जाते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांना या सुविधा का मिळू नयेत. ग्रामीण भागात अनेक गुणवंत विद्यार्थी आहेत. स्पर्धेच्या काळात त्यांना आकार देण्यासाठी माझा हा प्रयत्न आहे. शेवटी आपला मुलगा-मुलगी उच्च पदस्थ अधिकारी बनावे असे प्रत्येकच आईवडिलांना वाटते. उच्च पदस्थ अधिकारी हे ग्रामीण भागातूनच आल्याचे वास्तव आहे.- बाळा काशीवार, आमदार विधानसभा क्षेत्र साकोली .आमदार निधीतून जिल्हा परिषद शाळा डिजीटल करण्यासाठी आमदार बाळा काशिवार यांनी ७५ लाख ९२ हजार ९९९ रूपयांचा निधी दिला. यात ७९ शाळा डिजीटल झालेल्या आहेत. यापैकी ११ लाख ४३ हजारांचा निधी शिल्लक आहे. हा निधीतून १५ शाळा डिजीटल करण्यात येणार आहे. शाळा डिजीटल करण्यासाठी प्रथमच आमदार निधी मिळाला असून हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे.- श्रीकांत गायधने, वरिष्ठ सहायक, शिक्षण विभाग, भंडारा.