शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

करडी पोलीस ठाणे मुहूर्ताच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: August 6, 2015 01:47 IST

राज्याचे माजी गृहमंत्री दिवंगत आबा पाटील यांनी जनतेला दिलेला शब्द पाळला. धडाडीचे निर्णय घेत सन २०१४ मध्ये करडी पोलीस चौकीला ठाण्याचा दर्जा देत मंजुरी दिली आहे.

युवराज गोमासे  करडीराज्याचे माजी गृहमंत्री दिवंगत आबा पाटील यांनी जनतेला दिलेला शब्द पाळला. धडाडीचे निर्णय घेत सन २०१४ मध्ये करडी पोलीस चौकीला ठाण्याचा दर्जा देत मंजुरी दिली आहे. सन १९६२ पासून सातत्याने होणाऱ्या नागरिकांच्या मागणीला अखेर न्याय मिळाला. नागरिकांनी आनंद व्यक्त केला, आभार व्यक्त केला. परंतु एक वर्ष लोटला असताना ठाण्याच्या कारभाराला सुरूवात झालेली नाही. शासन व प्रशासनाला शुभारंभाचा मुहूर्त सापडलेला नसल्याने नागरिकांत असंतोषाचे वातावरण आहे. ठाण्याच्या दृष्टीने पर्याप्त सोयी-सुविधा नाहीत.करडी परिसर नक्षलग्रस्त क्षेत्रात मोडतो. कोका जंगल टेकड्यांचा पायथ्याशी वसलेल्या किरणापूर व केसलवाडा गावात सन १९९९ रोजी नक्षल कारवाया केल्याची नोंद पोलीस अभिलेखात आहे. सन १९६२ रोजी करडी येथे पोलीस चौकीची स्थापना केली. तेव्हापासूनच चौकीला नागरिकांनी विरोध दर्शविला. नागरिकांना पोलीस ठाणे हवे होते. मात्र तत्कालीन पुढाऱ्यांनी मागणीकडे दुर्लक्ष करिता चौकी निर्माण केली. पोलीस चौकीचे कामकाज मोहाडी पोलीस ठाण्याला जोडण्यात आलेले आहे. नियंत्रण व गुन्ह्याची नोंद मोहाडी येथे करडी लागत असल्याने नागरिक व पोलिसांना नेहमी अडचणीचा व त्रासाचा फटका सहन करावा लागतो. त्याचबरोबर मोहाडी ठाण्याचे अंतर चौकीपासून ४० कि.मी. तर जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण ६० कि़मी. अंतरावर आहे.गस्तीसाठी वाहनाअभावी अडचणीचौकीच्या कार्यक्षेत्रात २७ गावे व ३७ चौरस कि़मी.चा परिसर आहे. मात्र चौकीसाठी वाहन व्यवस्था नाही. एकच दुचाकी आहे. पोलीस स्वत:च्या वाहनाने कर्तव्य बजावतात. मोठी घटना वा अपघाताच्या वेळी जखमींना वा आरोपींना ४० कि़मी. अंतरावरील मोहाडी येथे नेण्यासाठी खाजगी वाहनांची वाट पाहावी लागते. परिसरात ऐलोरा पेपर मिल व वैनगंगा शुगर कारखान्याचा परिसर आहे. करडी, पालोरा, मुंढरी, देव्हाडा आदी बाजारपेठेची ठिकाणे आहेत. चोरीच्या घटना घडत असतात. अशावेळी रात्रीची गस्त घालण्यासाठी सुद्धा अडचणींचा सामना करावा लागतो.चौकी भाड्याचे घरातसन १९६२ पासून पोलीस चौकी भाड्याच्या घरात आहे. सन १९८७ पर्यंत जामा मस्जिद परिसरात तर सध्या नामदेव आत्माराम कानतोडे यांचे घर किरायाने घेतले आहे. सन २०१३-१४ मध्ये पोलीस चौकी करिता कार्यालयीन इमारत व दोन निवासस्थानांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. समोरच्या भागातून आवारभिंतीचे बांधकाम झाले. मात्र पोलीस ठाण्याच्या दृष्टीने हवी असलेली कार्यालयीन इमारत व पर्याप्त निवासस्थाने निर्माणाच्या दृष्टीने प्रयत्न झालेले नाहीत.आरोपींसाठी कोठडी नाहीकरडी पोलीस चौकीच्या नव्याने बांधलेल्या इमारतीत आरोपींसाठी पर्याप्त सेल नाही. मोठी घटना व पोलीस कोठडीतील तपासाठी त्यामुळे अडचणी वाढणाऱ्या आहेत. त्यादृष्टीने प्रयत्न झालेले नाहीत. त्यामुळे आरोपींना ठेवण्यासाठी कोठडीची गरज आहे.