शहरं
Join us  
Trending Stories
1
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; गोळीबारात आतापर्यंत ९ मृत्यू ८० जखमी
2
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार
3
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
4
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
5
पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं
6
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
7
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
8
सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट
9
पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!
10
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
11
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
12
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
13
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
14
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला
15
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
16
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
17
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?
18
एका वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणारे ५ मधल्या फळीतील फलंदाज!
19
मंदीच्या उबरठ्यावर अमेरिका! कोरोनापेक्षाही भीषण स्थिती;२००८ मध्ये भविष्यवाणी करणाऱ्यानं पुन्हा दिला इशारा
20
Pitru Paksha 2025: पितृपक्षाची सुरुवात कोणी व कोणासाठी केली? प्रत्येकाला हे माहीत असलेच पाहिजे!

करडी पोलीस ठाणे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: August 14, 2014 23:35 IST

मोहाडी पोलीस ठाण्यांर्गत असलेल्या करडी चौकीचे सन २०१४ वर्षाच्या सुरुवातीला पोलीस ठाण्यामध्ये रूपांतर करण्यात आले. ठाणेदाराचे कार्यालय व पोलिसांच्या निवासस्थानांचे बांधकाम पूर्ण झाले.

करडी(पालोरा) : मोहाडी पोलीस ठाण्यांर्गत असलेल्या करडी चौकीचे सन २०१४ वर्षाच्या सुरुवातीला पोलीस ठाण्यामध्ये रूपांतर करण्यात आले. ठाणेदाराचे कार्यालय व पोलिसांच्या निवासस्थानांचे बांधकाम पूर्ण झाले. परिसरातील नागरिक उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र अजूनही पोलीस स्टेशनच्या उद्घाटनाची तारीख ठरलेली नाही.करडी पोलीस चौकीमध्ये सध्या ३ पोलीस कार्यरत आहेत. त्यामध्ये डिसेंबर २०१३ पासून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अश्विनकुमार मेहर, हवालदार आसाराम नंदेश्वर, नायब शिपाई गौरीशंकर गौतम यांचा समावेश आहे. ३ पोलिसांवर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबत अवैध धंद्यावर नियंत्रण करण्याची जबाबदारी आहे. जबाबदारी पार पाडताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. असे असतानाही त्यांनी त्यात यश मिळविले आहे. परिसरातीलल २५ गावात अवैध दारुचे धंदे बंद करण्याबरोबर अवैध प्रवासी वाहतूक, कोंबडा बाजार, मॅग्नीजची तस्करी, रेती माफियांवर नियंत्रण मिळविण्यात आले. ग्रामपंचायत प्रशासनाचे माध्यमातून बसस्थानकात वाहतुकीला अडचणीचे ठरणारे मटन मार्केट व इतर दुकाने हटवून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरित करण्यात आले. सामान्य नागरिकांच्या तक्रारीवर वेळीच उपाय योजना केली जाते. किरकोळ प्रकरणे, घरगुती वादविवाद, पाणी व शेत संबंधीचे प्रश्न तत्काळ दखल घेऊन लोकसहभागातून व तंटामुक्त गाव समित्यांच्या माध्यमातून सोडविले जातात. नागरिकांच्या थेट संपर्कामुळे पोलिसांवरचा विश्वास वाढीस लागला असून राजकीय व्यक्तींच्या दुकानदाऱ्या बंद पडल्या आहेत. तक्रारींवर वेळीच कायदेशीर कार्यवाही केली जात असल्याने समाजात पोलिसांविषयी असलेले समज-गैरसमज दूर होण्यास मदत झाली आहे. महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. अपघातामध्ये वेळीच सहकार्य व मदत मिळत असल्याने पोलिसांविषयीच्या दृष्टीकोनात बदल जाणवत आहे.नव्या पोलीस स्टेशनच्या मंजुरीने नागरिकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्या पूर्ण होणार किंवा नाही हे काळच ठरवणार आहे. मात्र सध्यातरी १५ आॅगस्टच्या उद्घाटनाचा संभाव्य मुहूर्त टळलेला दिसत आहे. (वार्ताहर)