शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

टेकडीच्या मालकीबाबत कलगीतुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 22:10 IST

कित्येक दिवसांपासून साकोली ते गडकुंभली मार्गावर असलेल्या टेकडीचे जेसीबीच्या सहाय्याने अवैधरित्या खनन सुरु आहे. या खननामुळे जलशुध्दीकरण केंद्राला धोका निर्माण झाल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. यावर वनविभाग व महसूल विभागात टेकडीच्या मालकीबाबत कलगीतुरा सुरु झाला असून एकमेकांवर जबाबदारी ढकलण्यात येत आहे.

ठळक मुद्देजबाबदारी ढकलण्यात अगे्रसर : प्रकरण अवैध खननाचे

संजय साठवणे ।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : कित्येक दिवसांपासून साकोली ते गडकुंभली मार्गावर असलेल्या टेकडीचे जेसीबीच्या सहाय्याने अवैधरित्या खनन सुरु आहे. या खननामुळे जलशुध्दीकरण केंद्राला धोका निर्माण झाल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. यावर वनविभाग व महसूल विभागात टेकडीच्या मालकीबाबत कलगीतुरा सुरु झाला असून एकमेकांवर जबाबदारी ढकलण्यात येत आहे.तालुक्यातील गौण खनिजांची देखरेख तथा मालकी कुणाची आहे, असा प्रश्न या निमित्ताने उभा ठाकला आहे. वनविभाग व महसूल विभाग यांच्या मते अवैधरित्या खणन सुरु असलेली टेकडी क्षेत्र आमच्या विभागांतर्गत येत नाही. मग या टेकडीची मालकी कुणाची? असा प्रश्न उपस्थित झाल्याने या टेकडीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.या टेकडीवर वनविभागाचे विश्रामगृह असून त्याच्या खालील बाजूला वनविभागाची नर्सरी आहे. ज्यावेळी जलशुध्दीकरण योजना तयार करण्यात आली. त्यावेळी या जागेसाठी वनविभागाची परवानगी घेण्यात आली होती, हे विशेष. वनविभागाच्या माहितीनुसार गट क्रमांक ४०६/अ/१ च्या सिमेनंतर टीसीएम नाली खोदण्यात आली आहे. सदर खोदकाम हे नालीच्या बाहेरुन आहे. उल्लेखनीय म्हणजे राज्य शासनाच्या हद्दीत असलेली संपूर्ण मालमत्ता त्या राज्याची असते. परंतु महसुल विभाग या टेकडीच्या मालकीबाबद हक्क का दाखवित नाही. हाच खरा प्रश्न आहे. दुसरीकडे जलशुध्दीकरण केंद्र ते गडकुंभलीपर्यंत अवैध खणन होत असल्यामुळे कोट्यवधी रुपयांचे महसुल बुडत आहेत. या नुकसानीला जबाबदार कोण? हा प्रश्नही अनुत्त्तरीत आहे.