शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

खरीपाची नजरअंदाज पैसेवारी @ ७२

By admin | Updated: October 2, 2016 00:26 IST

धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात पावसाचा अनियमितपणा, किडींचा प्रादुर्भाव आणि निर्सगाच्या प्रकोपामुळे धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

शेतकरी पुन्हा संकटात : महसूल विभागाचा उंटावरुन शेळ्या हाकण्याचा प्रकारदेवानंद नंदेश्वर  भंडाराधानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात पावसाचा अनियमितपणा, किडींचा प्रादुर्भाव आणि निर्सगाच्या प्रकोपामुळे धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यानंतरही जिल्हा प्रशासनाने ३० सप्टेंबरला घोषित केलेल्या खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी ७२ पैसे घोषित केली आहे. परीणामी शेतकरी संकटात सापडणार आहे. सुरुवातीपासून जिल्ह्यात दुष्काळीस्थिती निर्माण झाली असताना परतीच्या पावसामुळे आता पिकांची स्थिती उत्तम कशी झाली, असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.गत चार वर्षांपासून भंडारा जिल्हा निसर्ग प्रकोपाचा सामना करीत आहे. यावर्षी त्यात आणखी भर पडली. मृग आणि रोहणी नक्षत्र कोरडे गेल्याने पेरण्या लांबल्या. शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. नंतरच्या काळात थोडा पाऊस बरसला. त्यानंतर पडलेल्या कडक उन्हामुळे पीक करपले. धानपिकावर किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. महागडी किटकनाशके खरेदी करुन पिक वाचविण्याचा शेतकरी धडपड करीत आहेत. आठवडाभरापासून परतीच्या पावसाने सुरुवात केली. मात्र या पावसामुळे हलक्या धानाची नासाडी होत आहे. शेतकऱ्यांवर बिकट परीस्थिती ओढावली आहे. कर्जाची परतफेड कशी करायची, असा प्रश्न त्यांना पडला आहे. महसूल विभागाने घोषित केलेल्या नजरअंदाज पैसेवारीत पिक स्थिती उत्तम दाखवून शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्ह्यातील ८९१ एकूण गावांपैकी ८४६ गावांमध्ये खरीप पिकांची लागवड करण्यात आली. या गावांच्या खरीप पिकांची पैसेवारी जाहिर करण्यात आली. सर्व ८४६ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा जास्त दाखविण्यात आली. यावर्षी जिल्हा प्रशासनाने धान उत्पादक शेतकरी संकटात असतानाही नजर अंदाज आणेवारी ७२ पैसे दाखवून शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोप करुन महसूल विभागाने उंटावरुनच शेळ्या हाकलण्याचा प्रकार केल्याचे दिसून येते.८९१ गावांपैकी ४५ गावांची पैसेवारी अघोषित४५ गावांमध्ये पिक नसल्यामुळे व रबी गावे असल्यामुळे त्या गावांची पैसेवारी जाहिर करण्यात आली नाही. यात ३५ गावे खरीपाची व १० गावे रबी पिकाची आहेत. १० रबी पिकांची पेरणी केलेली गावे ही भंडारा जिल्ह्यातील एकमेव पवनी तालुक्यातील आहेत. खरीप पिकांच्या गावांमध्ये भंडारा तालुक्यातील १७, तुमसर तालुक्यातील ८, पवनी ६, साकोली दोन, तर लाखनी तालुक्यातील दोन गावांचा समावेश आहे.