शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

भाजपमध्ये जल्लोष

By admin | Updated: May 16, 2014 23:49 IST

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या अभुतपूर्व यशाने जिल्ह्यात आज जल्लोष व्यक्त करण्यात आला. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी व ढोलताश्यांच्या

 भंडारा : लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या अभुतपूर्व यशाने जिल्ह्यात आज जल्लोष व्यक्त करण्यात आला. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी व ढोलताश्यांच्या तालावर कार्यकर्ते नाचत व जयघोष करीत आपला उत्साह व्यक्त करतांना दिसून आले.

आज सकाळपासूनच निवडणुकीचे निकाल येणार व यात कोणता उमेदवार विजयी होईल याची उत्सुकता मतदारांमध्ये होती. निवडणुकीचा निकाल बघण्यासाठी सकाळी ८ वाजतापासूनच घराघरांत टिव्ही सुरू होते. आज सुटीचा दिवस नसल्याने कार्यालयांत संगणकावरच निकाल बघण्यात कर्मचारी गुंग असल्याचे दिसून आले. देशाच्या निकालासोबतच आपल्या मतदार संघात कोणता उमेदवार निवडूण येणार याविषयीची उत्सुकता अधिक जास्त प्रमाणात जाणवली. यासाठी सोशल मिडियाचाही वापर करताना मतदार दिसून आले.

गोंदिया व भंडारा लोकसभा क्षेत्राची निवडणूक काही जास्तच अटीतटीची होती. केंद्रातले दिग्गज मंत्री प्रफुल पटेल येथून रिंगणात असल्याने अवघ्या देशाचे लक्ष गोंदिया व भंडारा लोकसभा क्षेत्राच्या निकालाकडे लागले होते. मात्र सकाळी निकाल सुरू झाल्यापासूनच महायुतीचे उमेदवार नाना पटोले हे आघाडीवर असल्याने भाजप-सेनेच्या गोटात जल्लोष होता. राष्ट्रवादीच्या गोटात मात्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या फेरीत तरी भाईजी आघाडी घेतील असा विश्‍वास राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व्यक्त करीत होते. मात्र सुरूवाती पासूनची आघाडी नानांनी सोडली नाही व अखेर गोंदिया व भंडारा लोकसभा क्षेत्राची ही जागा नानांनी महायुतीच्या झोळीत टाकली.

तुमसर- निकालाचा फरक वाढत जात असल्याने निकालाची अधिकृत घोषणा होण्याआधीच येथील भाजप व शिवसेना जिल्हा कार्यालयात फटाके फोडून व मिठाई वाटून विजयाचा आनंद व्यक्त करण्यात येत असल्याचे चित्र होते. सकाळपासूनच भाजप-सेनेचे कार्यकर्ते व शहरातील त्यांच्या चाहत्यांनी फटाके फोडून नानांच्या विजयाचा आगाज करून दिला होता. शहरातील बाजारपेठ तर नानांच्या विजयाच्या या वाटचालीने काही जास्तच आनंदी दिसून आली. सकाळपासूनच चौका चौकात कार्यकर्ते फटाक्यांची आतषबाजी करीत असताना दिसून येत होते. तर ढोलताश्यांच्या गजरात भारतीय जनता युवा मोर्चाच्या तरूण कार्यकर्त्यांंनी नाचत व नानांचा जयघोष करीत त्यांचा विजय साजरा केला.

विशेष म्हणजे व्यवसायी आपले काम सोडू शकत नसल्याने त्यांनी मात्र निकाल बघण्यासाठी आपापल्या प्रतिष्ठानांमध्ये व्यवस्था करून घेतली होती. तर काहींनी शेजार्‍यांकडे जाऊन आपली ही हौस पूर्ण करून घेतली. निकालाचा दिवस असल्याने सर्वांंनी बाहेर निघण्याचे टाळले व याचा परिणाम बाजारपेठेवर जाणवत होता. एरवी बाजारात असणारी गर्दी मात्र आज बघावयास मिळाली नाही. बाजारातील रस्ते ओस पडले होते व त्यात मात्र फक्त कार्यकर्त्यांंची वर्दळ नजरेत पडत होती.

पवनी- येथील भाजप व शिवसेना कार्यकर्त्यांंनी भाजपच्या तालुका कार्यालयासमोर फटाके फोडून मिठाई वाटप करीत नाना पटोलेंच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा केला.

याप्रसंगी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

साकोली- येथे काही ठिकाणी फटाके फोडून कार्यकर्त्यांंनी विजयाचा आनंद व्यक्त केला. सायंकाळी अनेक गावांमध्ये ग्रामस्थांनी विजयी जल्लोष साजरा केला. (लोकमत न्युज नेटवर्क)