शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीही गेली अन् जीवही

By admin | Updated: May 10, 2017 00:27 IST

विदर्भातील महत्वाकांक्षी गोसेखुर्द धरणासाठी ज्या शेतकऱ्यांनी आपले घरदार, शेती दिली त्या शेतकऱ्यांना मरणयातना भोगाव्या लागत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : विदर्भातील महत्वाकांक्षी गोसेखुर्द धरणासाठी ज्या शेतकऱ्यांनी आपले घरदार, शेती दिली त्या शेतकऱ्यांना मरणयातना भोगाव्या लागत आहेत. पाथरी येथील प्रकल्पग्रस्त जयेंद्र जानबा तागडे (४७) हा व्यक्ती मागील १० वर्षापासून गोसीखुर्द धरणावर कंत्राटी पद्धतीवर सुरक्षा रक्षकाचे काम करीत होता. दरम्यान, सोमवारला धरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी धरणावरील सुरक्षा रक्षकाचे काम माथाडी बोर्डाला देऊन १५ लोकांना कामावरून कमी केले. यामध्ये जयेंद्र तागडे यांचा समावेश होता. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असणाऱ्या जयेंद्रला याचा मानसिक धक्का बसून कालच हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रकल्पग्रस्त युवकाची नोकरी व जाण्याला व मृत्यूला जबाबदार असणाऱ्या धरण विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.जयेंद्र तागडे हे धरणाच्या कामाकरिता सर्व शेती, घर गेले आता काहीही शिल्लक राहिले नाही. घरी पत्नी, दोन मुले, दोन मुली असा मोठा परिवार आहे. सर्व मुले शिक्षणाचे. त्यामुळे प्रपंच चालवायला मोठी अडचण येत होती. अशातच १० वर्षापासूनगोसीखुर्द धरणावर कंत्राटदाराकडे सुरक्षा रक्षकाचे काम मिळाले. त्यामुळे संसार चालवायला थोडीफार मदत झाली. धरण विभागाचे अधिकारी या सुरक्षा रक्षकांना नेहमी खोटे आश्वासने देवून त्यांची दिशाभूल करीत आले आहेत. तुम्हाला कामावरून कोणत्याही परिस्थितीत कामावरून कमी केले जाणार नसल्याचे सांगितले गेले. शेवटच्या क्षणापर्यंत अधिकाऱ्यांची हीच भाषा होती. या जुन्या सुरक्षा रक्षकांना कालपर्यंत माथाडी बोर्डाचे कामगार घेणार असल्याचा थांगपत्ता लागू दिला नाही.काल या सर्व जुन्या सुरक्षा रक्षकांना ही माहिती कळताच त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ही बाब खातरजमा केली. जयेंद्र तागडे यांना ही माहिती कळताच त्यांच्या डोळ्यासमोर मोठ्या समस्या निर्माण झाल्या. संपूर्ण शेती धरणात गेल्यामुळे कुटुंबाचे गाडे कसे चालवायचे? उदरनिर्वाहाचे दुसरे कोणतेही साधन जवळ नव्हते. संपूर्ण कुटुंबच जयेंद्रवर अवलंबून होते. त्यामुळे कामावर कमी केल्याचा मोठा मानसिक धक्का बसून त्यांना हृदयविकाराचा झटका आला. दवाखान्यात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांसमोर फार बिकट समस्या आली आहे. जयेंद्रच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या धरण विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.