शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षतोडप्रकरणी जेसीबी केली जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 23:16 IST

रेल्वे रुळाजवळ रस्त्याचे कामादरम्यान जेसीबीने वृक्षतोड करणाऱ्या जेसीबीला नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी जप्तीची कारवाई केली. शुक्रवारी मौका पंचनामा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केला. पवनारखारी गाव शिवारातील कंपार्टमेंट क्र. ८ मध्ये वृक्षतोड करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : रेल्वे रुळाजवळ रस्त्याचे कामादरम्यान जेसीबीने वृक्षतोड करणाऱ्या जेसीबीला नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी जप्तीची कारवाई केली. शुक्रवारी मौका पंचनामा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केला. पवनारखारी गाव शिवारातील कंपार्टमेंट क्र. ८ मध्ये वृक्षतोड करण्यात आली.तुमसर -तिरोडी दरम्यान रेल्वे ट्रॅक असून पवनारखारी शिवारात रेल्वे रुळाला लागून रस्त्याचे काम केले जात आहे. हा संपूर्ण परिसर जंगलव्याप्त आहे. रेल्वे रुळाच्या बाजूला जेसीबी नेतांनी जंगलातील झाडे तोडण्यात आली. ही माहिती नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र अधिकारी नितेश धनविजय यांना मिळाली. तात्काळ वनपरिक्षेत्र अधिकारी धनविजय इतर कर्मचाऱ्यांसोबत पोहोचले. जेसीबीवर जप्तीची कारवाई केली. शुक्रवारी वनपरिक्षेत्र अधिकारी धनविजय तथा सर्व्हेयर यांनी मौका चौकशी करुन पंचनामा केला. घटनास्थळाजवळ काही शेतकऱ्यांची शेती आहे.सदर जागा नेमकी कुणाची आहे यांची चौकशीा सध्या सुरु आहे. अशी माहिती वनपरिक्षेत्रधिकारी धनविजय यांनी दिली. जेसीबीने वृक्षतोड केल्याप्रकरणाची चौकशी सुरु असून त्या अनुषंगाने जेसीबी ताब्यात घेण्यात आली. नियमानुसार जंगलव्याप्त परिसरात वाहन तथा इतर कामे करतांनी वनविभागाची परवानगी येण्याची गरज आहे. येथे रेल्वेची जमीन रेल्वे रुळाजवळ आहे, परंतु वृक्षतोड करता येत नाही. त्या आधारावर वनपरिक्षेत्र अधिकाºयांनी कारवाई केली आहे.