सुकळी प्रादेशिक पाणी पुरवठा : शासकीय निधीची नासाडी थांबविण्याचा निर्णयचुल्हाड (सिहोरा) : बपेरा जिल्हा परिषद क्षेत्रातील नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी सुकळी (नकुल) प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली असली तरी वांझोटी ठरली आहे. ज्या योजनेची अभिनव जलकुंभ स्थानिक नळ योजनांना जोडण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहे.वैनगंगा व बावनथडी नद्यांच्या खोऱ्यात बपेरा जिल्हा परिषद क्षेत्रातील गावे आहेत. परंतु या गावातील नागरिकांना नियोजनशुन्यता व राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाने शुध्द पिण्याचे पाण्यापासून वंचित ठेवले जात आहे. या क्षेत्रातील नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करुन बपेरा गावाच्या हद्दीत सुकळी (नकुल) प्रादेशिक पाणी पुरवठा योजना मंजुर करण्यात आली आहे. याच योजनेलगत जलशुध्दीकरण केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. पिण्याचे पाणी अती गरजू असतांना योजना जिवंत ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सातत्याने दुर्लक्ष केले आहे. यामुळे ही योजना आजघडीला भंगारात गेली आहे. या योजनेने नागरिकांना कधी महिनाभर तहान भागविण्यासाठी पाणी दिले नाही, असे चित्र असताना लोकप्रतिनिधींनी कधी नागरिकांची महत्वाची समस्या डोक्यावर घेतली नाही. यामुळे केवळ योजनेचा सांगाडा शिल्लक ठेवण्यात आलेला आहे. याशिवाय ही योजना परिसरात इतिहासजमा झाली आहे. महत्वाकांक्षी या योजनेचे गावात अभिनव जलकुंभ उभे आहेत. या जलकुंभांचा उपयोग होत नाही. यामुळे शासकीय निधीची नासाडी होत आहे. उपयोगाविना टाकी उभ्या असल्याने अनेक शेतकरी व गावकरी, जनावरे बांधण्यासाठी वापर करीत आहे असे असले तरी गावात पाणी टंचाईचे चित्र नाही.गावात स्थानिक स्तरावर नळयोजना असून नागरिकांची तहान भागवित आहेत. पंपगृहातून थेट पाणी वाटप केले जात आहे. तर काही गावात अल्प लिटर पाणी साठवणुक करणाऱ्या टाकी आहे. पंरतु मुबलक पाणी नागरिकांना उपलब्ध करणारे साधन गावात असतांना नियोजन शून्यतेमुळे गावकरी वंचित आहेत. प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे अभिनव टाकी स्थानिक नळयोजनांना हस्तांतरीत करण्याची ओरड गावात सुरु झाली आहे. नागरिकांच्या सोईसाठी या अभिनव टाकी ताब्यात घेण्यास ग्रामपंचायती उत्सुक असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु जीवन प्राधीकरण योजना स्वतंत्र असल्याने पंगा घेण्याचे स्थितीत स्थानिक प्रशासन नाही. या अभिनव टाकी उपयोगाविना ठेवल्याने गावकऱ्यांचे चांगभल होत नाही. अभिनव टाकी उपयोगात आणणारा निर्णय योग्य असल्याने जिल्हा परिषदेच्या सभेत हा विषय ठेवण्यात येणार आहे. या टाकीचे नळ योजनांना हस्तांतरण दिल्यास गावात एकाच वेळी ५० हजार लिटर पाण्याची साठवणूक होणार असल्याने लोकप्रतिनिधींनी या दिशेने पुढाकार घेण्यास सुरुवात केली आहे. (वार्ताहर)जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकारांची गरजशासनस्तरावर जनतेच्या हितार्थ अनेक योजना राबविल्या जात आहे. परंतु प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे या योजनाचा फायदा जनतेला होत नाही. गावात लाखो रुपये खर्चून अभिनव टाकी उभ्या असतांना उपयोगात आणले जात नाही. जलयुक्त शिवार अभियानाला डोक्यावर घेतले जात आहे. पंरतु पिण्याचे पाणी साठवणूक करणारे रेडीमेट टाकी उभ्या असतांना स्थानिक नळयोजनांना हस्तांतरण केले जात नाही. मुबलक पाणी व शुध्द पाणी जनतेला पुरवठा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. येरली योजना अंधातरी जाणारयेरली प्रादेशिक पाणीपुरवठा योजना विजेची थकबाकी वाढल्याने बंद झाली आहे. थकबाकीचे देयक करण्यासाठी ग्रामपंचायतीनी कानावर हात ठेवले आहे. सत्ताधारी व विरोधक आरोप प्रत्यारोपाचे तुणतुणे हलवित आहेत. नागरिकांनी उपाययोजना शोधण्यास सुरुवात केली आहे. या योजनेची भंगारात जाणेकडे वाटचाल सुरु झाली असून जिल्हा परिषदेने मायबापाची भूमिका पार पाडावी, अशी अपेक्षा आहे.
जलकुंभ नऊ योजनांना जोडणार
By admin | Updated: June 14, 2016 00:19 IST