शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

जीव धोक्यात घालून पडक्या घरात वास्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 00:33 IST

सबका साथ सबका विकास असे ब्रीदवाक्य घेऊन केंद्रात व राज्यात भाजप सरकारचे काम सुरू आहे.

ठळक मुद्देकुणी घर देता का घर ? म्हणण्याची वेळ : गरजू लोकांना घरकुलाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : सबका साथ सबका विकास असे ब्रीदवाक्य घेऊन केंद्रात व राज्यात भाजप सरकारचे काम सुरू आहे. २०२० पर्यंत देशात कुणीही बेघर राहणार नाही, असे सरकारचे धोरण आहे. पण वरठी येथील घराची विदारक परिस्थिती पाहून नटसम्राट या पात्रातील ‘कुणी घर देता का घर’ अशी वाक्य आठवतात. पडक्या घरात जीव धोक्यात घेऊन मुलबाळ सोबत संसार करणाºया गरजू कुटुंबीयांना अजून घरकुल मिळाले नसल्याने सरकारचे धोरण आणि घोषणा यात तफावत असल्याचे दिसते. सरकारचे धोरण कितीही चांगले असले तरी त्याला राबवणारी सरकारी यंत्रणा आणि गावातील राजकारण हेच याला कारणीभूत असल्याचे समोर आले आहे.वरठी हे गाव झपाट्याने वाढत आहे. झपाट्याने वाढलेल्या गावात नवीन नवीन वस्त्या तयार झाल्या. त्याप्रमाणे शेकडो घरकुल ही तयार झालेत. अनेक वर्षात वाटप झालेले घरकुल गरजू लोकांपर्यंत पोहचले नाही तर एकाच घरातील सदस्यांनी अनेक नावांनी लाटल्याचे दिसते. यात मात्र गरजू लोकांना यातना सोसाव्या लागताना दिसते. घरकुल मिळाल्याचा विरोध नाही पण निदान गरजू लोकांना मिळावे आणि नंतर सर्वांना असे म्हणणे आहे. पण वरठी येथे २० वर्षात असे कधीच झाले नाही. एकाच घरी अनेकांच्या नावाने घरकुल मिळाले तर काही लोकांना दोनदा घरकुल मिळाले. यामुळे अनेक कुटुंबियांना हक्काच्या घरापासून वंचित राहावे लागत आहे.नेहरू वाडार्तील माधव ढोक व नलिनी साठवणे यांच्या घराची विदारक तेवढीच भयंकर स्तिथी आहे. माधव ढोक आॅटोरिक्शा चालक असून आई वडील गेल्यापासून ते आपल्या वडिलोपार्जित घरात राहतात. जुन्या घराचे अध्यार्पेक्षा अधिक भाग पडलेला असून धोकादायक आहे. कवेलूच्या घराला असंख्य भगदाड पडले असून राहण्यासाठी एक खोली व स्वयंपाकघर आहे. घराजवळून नहर वाहतो. वडिलोपार्जित घराची अवस्था जनावरांच्य गोठ्यापेक्षा वाईट आहे. पावसाचे पाणी ठिकठिणाहून घरात पडते. अशा पडक्या घरात ते पत्नी व दोन मुलासह राहतात. एक दशकापासून घरकुल करीता अर्ज केला पण आजपर्यंत घरकुल मिळाले नाही. याच वार्डातील नलिनी साठवणे ही वरठी बायपास रस्त्यावर राहतात. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. यांच्या राहत्या घरातील एक भाग पडला आहे. सध्या पडक्या घराच्या शेजारी असलेल्या एका खोलीत मुला सोबत राहतात. अनेक ग्रामसभेत ते घरकुल मिळण्यासाठी भांडतात पण अजूनही त्यांना घरकुल मिळाले नाही.गांधी वॉर्डातील पुष्पां पटले कंपनीच्या मुख्य प्रवेश दाराच्या समोरासमोर त्यांचे घर आहे. त्यांची चंद्रमौळी झोपडी म्हणजे या घरात मानस राहतात म्हणायलाही लाज वाटेल असे घर आहे. अनेक वर्षांपासून या पडक्या घरात पती आणि दोन मुलासह त्यांचे वास्तव्य आहे. घर म्हणून असलेल्या आतील भागात ठिकठिकाणी उभे खांब लावले असून छतावर प्लास्टिक कागद ठेवून दगड व निरुपयोगी टायर टाकले आहेत. चार जण घरात बसतील एवढी जागा ही नाही. पती आजारी असल्यामुळे पुष्पांबाई स्वत: मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांना दोन मुलं असून शिक्षणाबरोबर ते मिळेल ते काम करून आईला पैशाची मदत करतात. माधव ढोक, नलिनी साठवणे व पुष्पा पटले मात्र उदाहरण आहेत. त्यांनी यासाठी अर्ज केला नाही किंवा ते नियमात बसत नाही असे ही नाही. या तिघांनी आतापर्यंत अनेक अर्ज केले ग्रामसभेत भांडले पण अजून पर्यंत त्यांना घरकुल मिळाले नाही. पण जे कधी आलेच नाही व नियमात बसत नाही अश्यांची गर्दीत त्यांचा आवाज दाबला गेला.घरकुलासाठी घर पाडलेनेहरू वॉर्डात तुळसाबाई लेंडे आपल्या तीन मुलासह झोपडीत राहत होत्या. चार वर्षांपूर्वी आलेल्या जोरदार पावसाने झोपडीच्या काही भाग कोसळला. तरी त्या एका भागात मुलासह राहत होत्या. दरम्यान एक नेत्याने १५ दिवसात घरकुल मंजूर करून देतो म्हणून उरलेले घर पाडायला सांगितले. घरकूलासाठी रिकामा प्लाट पाहिजे म्हणून तुळसाबाई ने घर पाडले. पण अद्याप त्यांना घरकूल मिळाले नाही. ते सध्या भाड्याच्या घरात राहतात.राजकीय इच्छाशक्तीचा अभावगरजू लोकांना घर देणे खूप कठीण नाही. एका गावात बोटावर मोजण्या पलिकडे लोक नाहीत. पण घरकुल वाटपात राजकीय स्वार्थ आणि मतदार एवढेच पाहण्याची पद्धत रूढ झालेली आहे. त्यातल्या त्यात बोलणाºयाची खार खाणे हे राजकारण्यांची परंपरा आहे. दरवर्षी शेकडो घरकुल वाटप होतात. पण ते वाटप करताना किंवा यादी बनवताना कधीच गरजू लोकांचा विचार होत नाही. एकंदरीत या सर्व समस्यांचे मूळ राजकीय इच्छाशक्ती वर अवलंबून आहे.