शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआय प्रवेश प्रक्रिया कर्मचाऱ्यांना भोवणार

By admin | Updated: September 11, 2015 01:00 IST

आयटीआय आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेला मात देत येथील कर्मचाऱ्यांना आर्थिक देवाण घेवाण करून तब्बल २१ विद्यार्थ्यांचे बोगस प्रवेश प्रक्रिया पार पाडल्याचे उघडकीस ....

समितीकडून चौकशी पूर्ण : २१ विद्यार्थ्यांना दिला होता बनावट प्रवेश लाखांदूर : आयटीआय आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेला मात देत येथील कर्मचाऱ्यांना आर्थिक देवाण घेवाण करून तब्बल २१ विद्यार्थ्यांचे बोगस प्रवेश प्रक्रिया पार पाडल्याचे उघडकीस आल्यानंतर सहसंचालक तंत्र व व्यवसाय मार्गदर्शन विभाग येथील समितीने तीन दिवसापूर्वी केलेल्या चौकशीत आढळून आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आठ ट्रेड अंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यवसाय व मार्गदर्शन प्रशिक्षण दिल्या जाते. यासाठी प्रवेश प्रक्रिया संगणीकृत केल्याने घेणारा प्रवेश प्रक्रियेतील घोळ थांबविण्यासाठी शासनाचा प्रयत्न त्याच विभागातील कर्मचाऱ्यांनी कसा हाणून पाडला हे चौकशीतून उघड झाले. आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया पार पाडल्यानंतर त्या विद्यार्थ्यांचे मुळ कागदपत्र त्या प्रशिक्षण संस्थेत तपासण्याकरिता ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी आर्थिक देवाण घेवाण करून तब्बल २१ विद्यार्थ्यांचे बोगस सदर संस्थेत प्रवेश दिल्याचे उघड झाले.दि. ३ सप्टेंबरला उच्चस्तरीय समितीने दिवसभर संस्थेत मुळ कागदपत्रांची तपासणी केली. मात्र यातील गुप्तता राखण्यात आली. परंतु मिळालेल्या माहितीनुसार २१ विद्यार्थ्यांचे प्रवेश चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला. या समितीच्या चौकशीचा अहवाल चौकशी प्रमुख कुकडे यांनी येत्या आठ दिवसात सदर संस्थेच्या प्राचार्याकडून उपलब्ध केला जाणार असल्याचे प्रतिनिधीला सांगितले.संस्थेत ज्या २१ विद्यार्थ्यांना चुकीच्या पद्धतीने कर्मचाऱ्यांशी संगनमत करून प्रवेश मिळविला होता. त्यातील बहुतांश विद्यार्थी चौकशी सुरु असताना संस्थेत गैरहजर आढळून आले. यातील दोषीवर कारवाईची मागणीही अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)