शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

डिझेल दरवाढीने धानाचे सिंचन महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 22:09 IST

तीन आठवड्यांपासून विदर्भासह राज्यात पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात धान पीक वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहे. भारनियमनामुळे डिझेल इंजिनावर सिंचन केले जात आहे. मात्र दररोज वाढणाऱ्या डिझेलच्या किमतीने सिंचन महागले आहे. डिझेलचे भाव ७८ रुपयांवर पोहचल्याने सिंचनासाठी एका तासाला ३०० ते ५०० रुपये मोजावे लागत आहे. याचा सर्वाधिक फटका पूर्व विदर्भातील भात उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे.

ठळक मुद्देपावसाची दडी : भारनियमनाचा बसतो फटका

युवराज गोमासे।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : तीन आठवड्यांपासून विदर्भासह राज्यात पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात धान पीक वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहे. भारनियमनामुळे डिझेल इंजिनावर सिंचन केले जात आहे. मात्र दररोज वाढणाऱ्या डिझेलच्या किमतीने सिंचन महागले आहे. डिझेलचे भाव ७८ रुपयांवर पोहचल्याने सिंचनासाठी एका तासाला ३०० ते ५०० रुपये मोजावे लागत आहे. याचा सर्वाधिक फटका पूर्व विदर्भातील भात उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे.सुरुवातीला निसर्गाने चांगली साथ दिल्याने पूर्व विदर्भातील भात पीक जोमाने वाढू लागले. मात्र तीन आठवड्यांपासून पावसाने दडी मारली. त्यामुळे भात पीक संकटात आले आहे. अशीच अवस्था पश्चिम विदर्भातील कपाशी आणि सोयाबीनची आहे. अशा परिस्थितीत पीक वाचविण्यासाठी शेतकरी सिंचन करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र ग्रामीण भागातील कृषी फिडरवर १४ तासाचे भारनियमन आहे. त्यातच कृषी फिडरला रात्रीच्या वेळी वीजपुरवठा केला जातो. रात्री मजूर मिळत नसल्याने ओलीत करणे शक्य होत नाही. परिणामी अनेक शेतकºयांनी आता डिझेल इंजिनचा आधार घेतला आहे. डिझेल इंजिन भाड्याने घेऊन शेतात सिंचन केले जात आहे. मात्र गत काही दिवसांपासून इंधनाच्या किमती वाढत आहेत. याचा फटका सिंचनाला बसत आहे. भंडारा शहरात डिझेल ७८ रुपयांच्यावर पोहचले आहे. त्यामुळे डिझेल इंजिन भाड्याने घेताना शेतकºयाची दमछाक होत आहे. बैलगाडीवरील डिझेल इंजिनसाठी प्रतीतास ३०० रुपये तर ट्रॅक्टरवरील इंजिनसाठी प्रतीतास ५०० रुपये मोजावे लागते. एका तासात अर्धा एकरही ओलीत होत नाही. परंतु पीक वाचविण्याच्या धडपडीत शेतकरी ओलीत करीत आहेत. डिझेलच्या किमती वाढल्याने शेतकºयांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.