शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षित वनातील शेतशिवारात अवैध लाकडांचा साठा

By admin | Updated: January 22, 2015 00:38 IST

वन संवर्धनासोबत वृक्ष लागवड आणि पर्यावरणाचे रक्षण यासाठी शासनस्तरावरुन जनजागृती करण्यात येते. मात्र प्रत्यक्षात ४५ ते ५० वर्षे जुन्या झाडांची कत्तल करून

तुमसर : वन संवर्धनासोबत वृक्ष लागवड आणि पर्यावरणाचे रक्षण यासाठी शासनस्तरावरुन जनजागृती करण्यात येते. मात्र प्रत्यक्षात ४५ ते ५० वर्षे जुन्या झाडांची कत्तल करून ही लाकडे वनालगतच्या शेतात ठेवण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना हाताशी धरून झाडे कापणे व नंतर विकण्याचा गोरखधंदा तुमसर तालुक्यात सुरु आहे.तुमसर वनपरिक्षेत्रातंगर्तत येणाऱ्या बपेरा वनक्षेत्रात चांदपूर - गोबरवाही मार्गावर खैरटोला या गावातील आंबा, मोहफुल, पळस, जांभुळ, भेरा, सालई, मोही, कसई, लिंब, जयमोहर प्रजातीची जवळपास १५० झाडे कापून ठेवली आहेत. ही झाडे सुमारे ४० ते ५० वर्षे जुनी आहेत. याची लांबी एक ते सात फूट व व्यास ५ ते ६ फूट इतका आहे. ही झाडे हातआरीने आणि कुऱ्हाडीने कापण्यात आली आहेत. शेतकऱ्यांच्या शेतातील ही झाडे कापण्यात आली आहेत. खैरटोला येथे सुमारे २० ते २५ घरे आहेत. या घरामागे ही झाडे होती. महसूल विभागाची यावर देखरेख असते. गावाला लागून व रस्त्याशेजारी तुमसर वनपरिक्षेत्राची सीमा प्रारंभ होते. बपेरा वनअंतर्गत हा संपूर्ण परिसर येतो. घनदाट जंगल परिसर असल्याने राखीव व संरक्षित वनाच्या सुमा येथून हाकेच्या अंतरावर आहे. मोहाडी खापा शिवारात थेरकर टोली आहे. येथील शेतात ४० ते ५० वर्षांची जुनी झाडे कापण्यात आली. सध्या ही झाडे शेतात पडून आहेत. ही झाडे महाकाय दिसतात. आंजन जातीची ही झाडे आहेत. शेतातील झाडांवर शेतकऱ्यांचा अधिकार आहे. परंतु ती कापण्यापूर्वी उपविभागीय अधिकारी, वनविभागाची परवानगी रितसर घेण्याची गरज आहे. परंतु, तसे करण्यात आलेले नाही.या परिसरात मागील अनेक महिन्यांपासून शेतशिवारातील झाडे कापून त्याचे लहान तुकडे करणे व विक्री करणारी टोळी सक्रीय आहे. या टोळीवर अंकुश लावण्याची गरज आहे. नियमबाह्य वृक्षतोड करणाऱ्यांना लगाम कोण लावेल हा मुख्य प्रश्न आहे. (तालुका प्रतिनिधी)