शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
2
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
3
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
4
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
5
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
6
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
7
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
8
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
9
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
10
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
11
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
12
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
13
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
14
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
15
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
16
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
17
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
18
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
19
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
20
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!

चांदपूर जलाशयातून ‘ती’ बोट हलविण्याचे निर्देश

By admin | Updated: February 16, 2016 00:44 IST

चांदपूर जलाशयात अनधिकृत बोटिंग व्यवसाय सुरु केल्याप्रकरणी पाटबंधारे विभागाने मत्स्यपालन संस्थेचे अध्यक्ष शांताराम शहारे यांना नोटीस बजावली आहे.

मासोळी उत्पादनाचे कंत्राट रद्द होणार : लघु पाटबंधारे विभागाचा दुसऱ्यांदा नोटीसरंजित चिंचखेडे चुल्हाड (सिहोरा)चांदपूर जलाशयात अनधिकृत बोटिंग व्यवसाय सुरु केल्याप्रकरणी पाटबंधारे विभागाने मत्स्यपालन संस्थेचे अध्यक्ष शांताराम शहारे यांना नोटीस बजावली आहे. याशिवाय जलाशयातून अनधिकृत बोट हटविण्याचे निर्देश देण्यात आले असून अध्यक्षांनी असहकार्याची भूमिका घेतली आहे.अनधिकृत बोटींग व्यवसाय प्रकरणी सिहोरा पोलीस ठाण्यांतर्गत मागासवर्गीय बहुउद्देशिय मत्स्यपालन सहकारी संस्थेचे अध्यक्ष शांताराम शहारे व अन्य आठ संचालकांना नोटीस बजाविण्यात आली आहे. जलाशयात बोटिंग व्यवसायाला प्रशासनाची मंजुरी नसताना व्यवसाय सुरु झाला आहे. त्यामुळे अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे पोलिसांनी सावधगिरीचा उपाय म्हणून १४९ कलमान्वये नोटीस बजावली आहे. ३२८ हेक्टर जागेतील या जलाशयाची खोली ३७ फुट आहे. जलाशयात मासोळी उत्पादन, मासेमारी व जलाशयाचे संवर्धन या आधारे मागासवर्गीय बहुउद्देशिय मत्स्यपालन सहकारी संस्थेला लिजवर देण्यात आले. या व्यवसायाकरिता डोंग्याचा उपयोग करण्याची तरतूद आहे. परंतु मागील सहा महिन्यापासून डोंगा पर्यटकांच्या भ्रमंतीकरीता सुरू आहे. या डोंग्याला डिझेल इंजिन लावण्याची मंजुरी नसताना लाकडी डोंग्याला बोट तयार करण्यात आली. प्रती व्यक्ती ३० रूपये आकारणी होत असून पर्यटकांच्या जीवाचा खेळ राजरोसपणे मांडला जात असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने मांडले आहे. वृत्त प्रकाशित होताच पाटबंधारे विभागाने मत्स्यपालन संस्थेचे अध्यक्ष शांताराम शहारे यांना नोटीस बजावली. जलाशयातून डिझेल इंजिन लावण्यात आलेला डोंगा हटविण्याचे निर्देश दिले आहे. परंतु डोंगा हटविण्याची तसदी घेतली नाही. मसोळी उत्पादन व मासेमारी करण्यासाठी जलाशयाचे लिजवर कंत्राट देण्यात आले आहे. यात जलाशयाचे संवर्धन करण्याची तरतूद आहे. परंतु पाटबंधारे विभागाने डोंगा असलेली बोट जप्त करण्याची कारवाई केली नाही. या विभागात जप्तीची कारवाईकरीता लागणारा निधी व मनुष्यबळ नसल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे.प्रभारी शाखा अभियंते, रिक्त पदे यामुळे जलाशयावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा अपुरी पडत आहे. जलाशयावर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्मचारी नाही. तुर्तास बोटींग व्यवसाय बंद करण्यात आला असला तरी अनधिकृत बोट जलाशयात ठेवण्यात आली आहे. जलाशयात मासोळी उत्पादन, मासेमारी व जलाशयाचे संवर्धनासाठी लीजवर देण्यात आले आहे. अनधिकृत बोटिंग व्यवसाय सुरु करण्यात आल्याने डिझेल इंजिन लावण्यात आलेला डोंगा हटविण्याचे निर्देश दिले आहे.- वाईन देशकर, शाखा अभियंता सिहोराजलाशयात मासेमारी करण्यासाठी डोंग्याचा उपयोग केला जातो. यामुळे डोंगा जलाशयात ठेवला असून हटविण्याचा प्रश्नच येत नाही.- शांताराम शहारे, अध्यक्ष मत्स्यपालन संस्था चांदपूर.