शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

केटीएस रूग्णालयात सुविधांची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2016 00:36 IST

केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात सर्वच सोयी उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात अनेक गैरसोयी असून परिसरातही दारूचे बाटल्या पडलेल्या आढळतात.

गोंदिया : केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात सर्वच सोयी उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात अनेक गैरसोयी असून परिसरातही दारूचे बाटल्या पडलेल्या आढळतात. रूग्णांच्या नातलगांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या सर्व प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी खा. नाना पटोले यांना केली आहे.नागरिकांच्या तक्रारीनुसार, केटीएस रूग्णालयात रूग्णांच्या नातलगांना राहण्याच्या सोयीसाठी कँटीनची व्यवस्था करण्यात यावी. रूग्णालयाच्या बाजूला क्वॉर्टर्स असून त्यात १० ते १५ वर्षांपासून काही परिवार राहत आहेत. ते शासनाची वीज व पाण्याचा वापर विनामूल्य करीत आहेत, याचीसुद्धा चौकशी करण्यात यावी. रूग्णालयाच्या आवारात चहानास्त्याच्या टपऱ्या सुरू आहेत. तेसुद्धा पाण्याचा वापर करतात. शासकीय आवारात मागील १५ वर्षांपासून चहानास्त्याची दुकाने चालवितात. शिवाय त्या दुकानांत दारूचे पव्वेसुद्धा उपलब्ध असतात. सकाळच्या वेळी दारूचे रिकामे पव्वे जिकडेतिकडे पडलेले आढळतात. रूग्णालयाचे कामसुद्धा बोगस पद्धतीने सुरू असून बिलांची चौकशी करण्यात यावी. रूग्णालयातील शौचालये स्वच्छ नसतात. पाणी नसते. तसेच पंखेसुद्धा बंदच असतात. अशाप्रकारची तक्रार खा. नाना पटोले यांच्याकडे करण्यात आली आहे. तसेच त्याच्या प्रतिलिपी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, उपसंचालक आरोग्य सेवा व जिल्हा शल्य चिकित्सक यांना देण्यात आल्या आहेत. तक्रारकर्त्यांमध्ये संजय डोंगरे, संजय मेश्राम, प्रेमलाल बघेले, संतोष बिसेन, चंद्रकांत मेश्राम, अमोल डोंगरे, छगन जामरे, बी.आर. नेवारे, महेंद्र वासनिक, अजय वोवूरकर, रूपाली अनुले, संतोष नेवारे, शीला भुमके, गोपाल कुसन आदींचा समावेश आहे. (प्रतिनिधी)