शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

संगायो विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांची चौकशी करा!

By admin | Updated: January 19, 2017 00:29 IST

कामात हयगय करून तसेच समितीच्या सदस्यांशी अभद्र व्यवहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कामचुकारपणाची चौकशी करून ...

तहसीलदारांना निवेदन : प्रकरण महसूल कर्मचाऱ्यांच्या कामबंदचेतुमसर : कामात हयगय करून तसेच समितीच्या सदस्यांशी अभद्र व्यवहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कामचुकारपणाची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन संगायो समितीने तहसिलदारांना दिल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. १६ जानेवारी रोजी संगायोच्या आयोजित सभेत समिती सदस्याने शिविगाळ केली तसेच मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे कांगावा करित महसूल कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. आज दुसऱ्या दिवशीही कर्मचाऱ्यांनी काम बंद होते. परिणामी अनेकांना आल्यापावली परत जावे लागले. दरम्यान संगायो समितीचे अध्यक्ष मुन्ना पुंडे, लालु हिसारिया यांच्या नेतृत्वात तहसिलदारांना निवेदन देवून संजय गांधी योजनेत कार्यरत कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे, शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहचावा म्हणून स्वत: जिल्हाधिकारी तुमसर पं.स. मध्ये सभा बोलावून निर्देश दिल्याप्रमाणे समिती कार्य युद्ध स्तरावर करित आहे. मात्र या विभागात कार्यरत कर्मचारी हे आपल्या कर्तव्यात हयगय करित असल्यामुळे अनेक गरजू लाभार्थी लाभापासून वंचित आहेत. सदर घटनेच्या वेळी पात्र व अपात्र लाभार्थ्यांची यादीची मागणी केली होती. त्यापुर्वीच तेथील कर्मचाऱ्यांना सभेत यादी ठेवण्याच्या सुचनाही देण्यात आल्या होत्या. मात्र हेतु पुरस्पर समितीच्या सदस्याशी तेथील अव्वल कारकून सुनिल लोहारे यांनी अभद्र व्यवहार केला व व्हिडीओ क्लिप तयार केले आहे. समितीच्या सदस्यांना अपमान जनक वागणूक देवून दुसरीकडे कामचुकार करणारेच कर्मचारी मुजोरी करित असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे. संबंधित कर्मचारीही पुरवठा विभागात कार्यरत असताना उत्पन्नापेक्षा जास्त माया जमविली आहे. त्याचीही चौकशी करण्यात यावी, जे कर्मचारी मुख्यालयात राहत नाही. त्यांच्याकडून घरभाडे वसुल करण्यात यावे, अशी मागणी समितीने पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. शिष्टमंडळात मुन्ना फुंडे, संतोष वैद्य, लालु हिसारिया, गजानन निनावे, गुरूदेव भोंडे, शेखर कोतपल्लीवार, प्रकाश पारधी, संदीप ताले, कैलास जोशी, अशोक उईके, बाल्या मदनकर व अन्य उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)