शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

महिलांना मिळणार योजनांची माहिती

By admin | Updated: August 3, 2016 00:30 IST

महिला सक्षमीकरणासोबतच महिलांना सर्व योजनांची माहिती व लाभ देण्यासाठी ६ आॅगस्ट रोजी....

तुमसर येथे ६ आॅगस्टला मेळावा : उपविभागीय कार्यालयाचे आयोजनभंडारा : महिला सक्षमीकरणासोबतच महिलांना सर्व योजनांची माहिती व लाभ देण्यासाठी ६ आॅगस्ट रोजी तुमसर व मोहाडी येथील भव्य महिला मेळावा तसेच समाधान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या मेळाव्यात शासनाच्या सर्व विभागांनी सहभागी होवून आपआपल्या विभागाच्या योजनांच्या माहितीचे स्टॉल लावण्यात यावेत, अशा सूचना तुमसरच्या उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाली यांनी केल्या.तुमसर व मोहाडी येथील मेळाव्याच्या नियोजनासाठी आज उपविभागीय कार्यालय तुमसर येथील सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी उपरोक्त सूचना दिल्या. १ ते ७ आॅगस्ट दरम्यान शासन राज्यभरात महसूल सप्ताह साजरा करीत असून या निमित्ताने तुमसर व मोहाडी येथे ६ आॅगस्ट रोजी तालुकास्तरीय मेळावा होणार आहे.या मेळाव्यात विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. यात समाज कल्याण विभाग, कृषी विभाग, आत्मा, महिला आर्थिक विकास महामंडळ, ग्राहक संरक्षण, सातबारा वाटप, स्वच्छ भारत अभियान, महिला व बाल विकास यासह शासनाच्या विविध योजनांची माहिती महिलांना देण्यात येणार आहे. यासोबतच महिलांची आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, आहार विषयक माहिती, महिला समुपदेशन, अपघात विमा योजना, विद्यार्थिनींना सायकल वाटप, घरकुल वाटप या योजनांची प्रत्यक्ष लाभ देण्यात येणार आहे. तसेच महसूल विभागांतर्गत विविध दाखले व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे.या मेळाव्यात महिला विषयक कायदे, अंधश्रद्धा निर्मूलन व महिलांचे हक्क याबाबत तज्ज्ञ व्याख्यातांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. ६ तारखेला सकाळी तुमसर शहरातून विद्यार्थिनींची मोटर सायकल रॅली काढून जनजागृती करण्यात येणार आहे. या मेळाव्यात आधार नोंदणी तसेच ज्या योग्य व्यक्तींना वयाची १८ वर्ष पूर्ण झाली अशांचे मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. नव्या मतदारांना मतदार छायाचित्र ओळखपत्र वाटप, जात प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे. पंतप्रधान उज्वला योजना, सोलर योजना, संजय गांधी निराधार योजना, माविमंच्या योजना, आत्माच्या योजना व मनोधैर्य योजना याबाबत माहिती देण्यात येणार आहे.या मेळाव्यास महिला सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आशा वर्कर, आंगणवाडी सेविका, महाविद्यालयीन विद्यार्थिनी तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या सर्व महिलांना शासनाच्या योजनांची माहिती देण्यासाठी प्रत्येक विभागांनी आपल्या योजनांचे स्टॉल लावावेत, अशी सूचना उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी केली. मोहाडी व तुमसर तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी या मेळाव्यात सहभागी होऊन शासकीय योजनांची माहिती करून घ्यावी व लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. (शहर प्रतिनिधी)