शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

मुलांचे जन्मप्रमाण वाढता वाढेना

By admin | Updated: January 22, 2015 00:36 IST

या तालुक्यात मुला-मुलींचे प्रमाण तेवढे समाधानकारक नाही. मात्र मुलींचा जन्मदर घसरतो आहे. पाच वर्षातील तफावत धक्कादायक नसती तरी...

राजू बांते मोहाडीया तालुक्यात मुला-मुलींचे प्रमाण तेवढे समाधानकारक नाही. मात्र मुलींचा जन्मदर घसरतो आहे. पाच वर्षातील तफावत धक्कादायक नसती तरी चिंतनीय आहे हे आरोग्य विभागाच्या अहवालावरून दिसून आले आहे.मुलगाच वंशाचा दिवा म्हणून होणाऱ्या स्त्रीभृण हत्या थांबाव्यात, मुला-मुलींमधील मतभेद नष्ट व्हावेत यासाठी शासन, सामाजिक संस्था, विविध संघटनाच्या माध्यमातून अनेक प्रयत्न सुरू आहेत. तरी मुलींचे जन्म प्रमाण वाढता वाढेनासे झाले आहे.स्त्रीभृण हत्येचे प्रमाण वाढले आहे.गेल्या पाच वर्षात मोहाडी तालुक्यात ७३३४ एकूण मुले-मुली जन्माला आली आहेत. त्यात पाच वर्षात २०१४ अखेर ३८५० मुले व ३४९४ मुली जन्माला आल्या आहेत. २००९ ते २०१४ या काळात मुलीचे वर्षाला ८८,१३, १२०, १०२ व ४३ असा फरक दिसून आला आहे. हे प्रमाण धोकादायक नसल्याचे बोलले जाते. गेल्या पाच वर्षात मुलांच्या प्रमाणात ३६६ मुली कमी जन्माला आलेल्या आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक आवाहने आहेत. मुलांच्या तुलनेत मुलींची घटत असलेली संख्या चिंतेची बाब बनली आहे. ० ते ६ वयोगटातील मुला-मुलींमधील गुणोत्तर महत्वाचे माणण्यात येते. मुलींना कमी दर्जा दिला जातो. ही बाब २०११ सालच्या लिंग गुणोत्तर प्रमाणावरून प्रकर्षाने जाणवते. सोनोग्राफिचा गैरफायदा घेत भृण हत्येचे प्रमाण होतात. दरवर्षी होणारी मुलींची संख्या भयावह परिस्थिती निर्माण करणारी आहे. राज्यात २००१ साली दर दहाव्या मुलामागे संख्या ९१३ होती आता ती संख्या ८८३ एवढी झाली आहे. पूर्वीच्या काळात मुलगाच वंशाचा दिवा अशी भावना सर्वसामान्य बाब होती. विज्ञानाच्या प्रगतीमुळे अवघ्या अडीच तीन महिन्यात मातेच्या पोटातील बाळ मुलगा, मुलगी आहे हे समजू लागले आहे.