शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

कालव्याच्या अपूर्ण कामाने शेती जलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 23:07 IST

येथून जवळच असलेल्या मुरमाडी ते विहिरगाव कन्हाळ्याकडे जाणाऱ्या गोसीखुर्द कालव्याचे काम अर्धवट सोडून दिल्याने कालव्यातून येणारा मोठा जलप्रवाह जवळच्या शेतामध्ये शिरला. परिणामी लगतची शेकडो एकर शेती पाण्याखाली आली. आजही विहीरगाव कन्हाळ्या येथील बºयाच मोठ्या क्षेत्रात पाणी साचून आहे. या शेतीतील बरेचसी रोवणी सडण्याच्या मार्गावर आहेत. तसेच रोवणी न झालेल्या क्षेत्रातील पऱ्हे सडण्याच्या मार्गावर आहेत.

ठळक मुद्देसासरा परिसर : शेकडो हेक्टरवरील धान पीक धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कसासरा : येथून जवळच असलेल्या मुरमाडी ते विहिरगाव कन्हाळ्याकडे जाणाऱ्या गोसीखुर्द कालव्याचे काम अर्धवट सोडून दिल्याने कालव्यातून येणारा मोठा जलप्रवाह जवळच्या शेतामध्ये शिरला. परिणामी लगतची शेकडो एकर शेती पाण्याखाली आली. आजही विहीरगाव कन्हाळ्या येथील बºयाच मोठ्या क्षेत्रात पाणी साचून आहे. या शेतीतील बरेचसी रोवणी सडण्याच्या मार्गावर आहेत. तसेच रोवणी न झालेल्या क्षेत्रातील पऱ्हे सडण्याच्या मार्गावर आहेत.गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कालव्याच्या अर्धवट कामामुळे या शेतीतून पाण्याचा निचरा झाला नाही. परिणामी या परिसरातील शेकडो एकर शेतीतील धान पिकाचे नुकसान झाले आहे.यापूर्वी या परिसरातील शेतकरी सन २०१५ ला आपली लेखी तक्रार घेऊन आंबाडी सिल्ली येथील विदर्भ पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात गेले होते. आज हे चित्र पहायला मिळत आहे. या संबंधी विभागाच्या वरिष्ठांचे लक्ष वेधले होते. तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांनी मोका चौकशी केली. पण शून्य कारवाई झाली नाही. आजही परिस्थिती जैसे थे आहे. अधिकाºयांचा हलगर्जीपणा आजही शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसला आहे.सध्या या परिसरातील शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटाच्या विळख्यात अडकलेला आहे. शेतकऱ्यांवंर उपासमारी व आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. पाण्याखाली बुडालेल्या शेतीचे शेतकरी हे अल्प व अत्यल्प भूधारक आहेत.शासनाने विहिरगाव कन्हाळ्या परिसरातील शेतीचे मोका चौकशी करून नुकसान भरपाई प्रती हेक्टर ५० हजार रूपये याप्रमाणे देण्यात यावे, अशी मागणी शेतकºयांनी केलेली आहे. त्याचप्रमाणे हे रखडलेले काम शीघ्र गतीने पावसाळा संपताच पूर्ण करावे, अशीही मागणी केलेली आहे.