पालोरा (चौ.) : पालोरा परिसरात अनेक खाजगी व शासकीय दुग्ध संकलन केंद्र आहेत. यात पालोरा, लोणारा, बाम्हणी, मोखारा, खैरी भेंडाळा, कुर्झा आदी गावांचा समावेश येतो. यता भेंडाळा व पालोरा येथे मोठे संकलन केंद्र आहेत. या दुग्ध संकलन केंद्रावर संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुधात भेसळ केली जात आहे. कमी वेळात व कमी श्रमात लवकरात लवकर श्रीमंत होवून अधिक नफा कसा मिळविता येईल याकरीता दुग्ध उत्पादक आणि वितरक धडपड करीत आहेत. दुधाच्या व्यवसायात जास्तीत जास्त नफा कोणत्या प्रकारे होईल, या बेतात दुग्ध उत्पादक व विक्रेते लोकाच्या जिवनाशी खेळ खेळत आहेत. प्रत्येकाची दैनंदिन गरज असलेल्या दुधामध्ये रासायनिक वस्तंंूची भेसळ केली जात आहे. असे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. मात्र स्थानिक अन्न व औषध प्रशासन विभागाकडून उत्पादक व वितरक या दोघावरही कार्यवाही होत नसल्याचे दिसत आहे. मागील वर्षात अन्न व औषध प्रशासनाने अनेक दुग्ध संकलन केंद्रावर धाडी टाकल्यात अनेकांवर कार्यवाही केली. संकलन केंद्राचा परवाना रद्द केला मात्र हा सर्व देखावा होता. पुर्ववत ते संकलन केंद्र सुरू करण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अभयाने दुध संकलन केंद्र चालविणारे मालक मालामाल होत आहेत. पवनी तालुक्यात बऱ्याच प्रमाणात दुग्ध व्यवसाय करणारे आहेत. शेतीला जोळधंदा म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे जास्त प्रमाणात लक्ष देत आहेत. दुधाला चांगल्या प्रमाणात भाव मिळत असल्याने अनेक शेतमजूर दुध व्यवसवायाकडे वळत आहेत.सध्या मिळणाऱ्या दुधाच्या शुद्धीकरणावर त्यात भेसळीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दररोज सेवक करीत असलेल्या दुधामध्ये पौष्टीकता कमी आणि भेसळ युक्त पदार्थाचा वापरच अधिक प्रमाणात होत आहे. त्यामुळे मानवी जिवनाला धोका निर्माण झाला आहे. मागील काळात अन्न व औषध प्रशासनाने अनेक दुग्ध संकलणाच्या तपासण्या केल्यास याच बरोबर दुधापासून तयार होणारे खवा तपासणी केले. यात अनेक ठिकाणी भेसळ आढळल्याने खवा व दुध नाहीसा करण्यात आला. दुध संकलन केंद्र मालकावर कार्यवाही करण्यात आली नाही. दुध संकलन केंद्र मालक आपल्या नातेवाईकाकडे भेसळ युक्त पदार्थ ठेवतात व वेळ पाहून रात्रीचा फायदा घेतात. (वार्ताहर)
दुधातील भेसळीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
By admin | Updated: August 18, 2014 23:20 IST