शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

खरिप उत्पादनात भारी घट, बळीराजा झाला कंगाल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 11:35 IST

शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा : भविष्यातील तरतुदीचा प्रश्न कायम

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्ह्यात यंदाच्या खरिपात सुमारे १ लाख ८१ हजार हेक्टरवर धानाची लागवड झाली; परंतु प्रारंभापासून निसर्गाने शेतकऱ्यांची साथ सोडली. पूरपरिस्थिती व अतिवृष्टीने शेतीतील पिकांचे कंबरडे मोडले. उरली कसर कीड व रोगांच्या आक्रमणांनी पूर्ण केली. परिणामी धानाचा उतारा कमालीने घटला आहे. शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले आहे. कमी उत्पन्नातून झालेला खर्च कसा काढावा आणि भविष्याची तरतूद कशी करावी? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. 

जिल्ह्यात खरीप हंगाम आता अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांची धान कापणी व मळणीही जोमात सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांच्या मळणी आटोपल्या आहेत, त्यांचा धानाचा उतारा पायाखालची जमीन सरकविणारा ठरला आहे. एक एकरातून किमान १६ ते २५ पोती धानाचा उतारा यायला हवा होता. पण, यावर्षी केवळ ७, ८ व ९ पोती धानाचा उतारा येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

शेतकरी कंगाल, कर्ज परतफेडीचे संकट यंदाच्या खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तींनी शेतकरी पुरता नागविला गेला आहे. आर्थिकदृष्ट्या कंगाल झाला आहे. त्यामुळे शेतीचा हंगाम करताना उचल केलेले शासकीय तसेच खासगी कर्ज कसे फेडावे, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. घरी कुटुंबाचे भरणपोषण करण्यासाठी धानाची पिसाई करावी की पूर्ण विकून पुढे मजुरी करावी, अशा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

लष्करी अळी व रोगांमुळे झाली वाताहात जिल्ह्यातील हलके, मध्यम प्रकारच्या धानाची कापणी आणि मळणी सुरु असताना भारी धानावर लष्करी अळीने थैमान घातले. परिपक्च अवस्थेतील भारी धानाच्या लोंबांचा सडा जमिनीवर पडला. उरली सुरली कसर तुडतुडा व अन्य रोगांनी पूर्ण केली.

एकूण खचपिक्षा उत्पन्न निम्म्यावर यावर्षी शेतकऱ्यांचा धानाचा उतारा कमालीने घटला आहे. आर्थिक संकटाने शेतकरी खचले आहेत. मशागतीपासून पहे भरणी ते रोवणी, निंदण, कापणी, बांधणी आणि मळणीपर्यंत शेतकऱ्यांना दर एकरी २५ ते ३० हजार रुपये खर्च झाला; मात्र एवढा खर्च करूनही उत्पन्न केवळ १० ते १५ हजारांचे हाती लागत आहे. एकूण खचपिक्षा उत्पन्न निम्म्यावर आल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे.

"यावर्षी एकरी २० पेक्षा अधिक धानाचे उत्पादन होणार, अशी स्थिती होती. मात्र, पीक परिपक्वतेच्या अवस्थेत लष्करी अळीने घात केला. त्यातच विविध रोगांच्या आक्रमणाने प्रत्यक्षात एकरी ८ ते १० पोतीच धान झाले. झालेला खर्चही यातून निघण्याची शक्यता नाही. मी आणि माझे कुटुंब चार महिने शेतात काम केले, त्याचा हिशेबच नाही." - गौरीशंकर राऊत, शेतकरी, पांजरा (बोरी)

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीFarmerशेतकरीbhandara-acभंडारा