मुंबई-हावडा मार्गावर अप-डाऊन धावणाऱ्या ३४ रेल्वे गाड्या सुरू आहेत. यात ३ साप्ताहिक गाड्यांचा समावेश आहे. गोंदिया-इतवारी मार्गावर एकमेव सर्वसाधारण लोकल गाडी धावते. लोकल गाडीने प्रवास करण्यास निर्बंध नाहीत. पण कार्यालयीन किंवा व्यावसायिक दृष्टीने प्रवास करण्यास ती रेल्वे गाडी सोयीची नाही. भंडारा रोड रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या उर्वरित गाड्यांनी प्रवास करावयाचा असल्याचे आरक्षण असल्याशिवाय प्रवेश मिळत नाही. रेल्वेचे प्रवासी भाडे नियमित दराच्या दुप्पट असल्याने परवडणारे नाही.
बॉक्स
तिकीट किमती दुपटीपेक्षा जास्त
सध्याच्या स्थितीत रेल्वे आकारत असलेले प्रवासी भाडे दुपटीपेक्षा जास्त असल्याची माहिती मानसिंग हिरापुरे यांनी दिली. ते तिरोडा तालुक्यातील एका खेडेगावातून वरठी सॅनफ्लॅग कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून कामावर आहेत. कोरोना प्रादुर्भावाच्या पूर्वी त्यांना प्रवास करण्याकरिता लोकल तिकीट १० रुपये लागायची. सध्या त्यांना ३० रुपये मोजावे लागत आहेत. एकंदरीत सर्व ठिकाणच्या प्रवासी तिकिटात सारखीच वाढ आकारली जात असल्याचे कळते.
आरक्षण बंद करण्याची गरज
रेल्वे विभागाकडून आरक्षणाच्या नावावर होणारी पिळवणूक बंद करण्याची मागणी येथील व्यापारी सुधीर बागडे यांनी केली आहे. सुधीर बागडे यांचे जनरल दुकान असल्याने त्यांना आठवड्यातून दोन-तीन वेळा नागपूर व गोंदिया येथे खरेदीला जावे लागते. कधी कधी जाणे ठरवून नसते. ग्राहकांच्या मागणीनुसार धावत-पळत खरेदीला जावे लागते. पण आरक्षणाचे निर्बंध असल्याने व्यवसायात नुकसानाला सामोरे जावे लागते. कोविडमुळे व्यवसाय डबघाईस आले असताना एखादी संधी मिळाली तरी रेल्वेच्या आरक्षण निर्बंधाने लाभ घेता येत नाही.
सामान्य प्रवास सुरू करण्याची गरज
रेल्वे प्रवास सुरक्षित व आर्थिक बाबतीत परवडणारा आहे. प्रवास करण्याकरिता असलेले निर्बंध हे नागरिकांच्या हिताचे आहेत. कठीण काळ बघता सरकारने प्रवासबंदीच्या नियमात शिथिलता आणून सामान्य प्रवासाकरिता प्रवास निर्बंध विरहित करून जनजीवनाची घडी रुळावर येण्यास मदत करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश हिंगे यांनी केली.