शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

वाचनालयाच्यावतीने गुणवंतांचा सत्कार

By admin | Updated: August 1, 2016 00:25 IST

येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने मार्च २०१६ च्या दहाव्या वर्गाच्या परिक्षेत ९२ टक्के, १२ व्या वर्गाच्या परिक्षेत ९० टक्के पेक्षा जास्त गुण, ...

सार्वजनिक वाचनालयाचा उपक्रम : बक्षीस प्राप्तीनंतर भारावले विद्यार्थीभंडारा : येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने मार्च २०१६ च्या दहाव्या वर्गाच्या परिक्षेत ९२ टक्के, १२ व्या वर्गाच्या परिक्षेत ९० टक्के पेक्षा जास्त गुण, सीबीएससी पॅटर्नच्या १० व्या वर्गाच्या परिक्षेत ९५ टक्के व १२ वी च्या परिक्षेत ९० टक्के पेक्षा जास्त गुण, १२ वी च्या जिवशास्त्र व इंग्रजी विषयात भंडारा शहरातून प्रथम व १० वी व १२ वी च्या परिक्षेत मागासवर्गीय एस.सी. प्रवर्गातून भंडारा शहरातून सर्वात जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सत्कार सार्वजनिक वाचनालय येथील इंद्रराज सभागृहात करण्यात आला.कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष धनंजय दलाल होते.यावेळी शहरातील जेष्ठ शिक्षक मनोहरराव बोंगीरवार यांचा, छत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाल्याबद्दल मोहन दाढी यांचा सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये शहरात प्रथम आल्याबद्दल कै. दशरथराव जागेश्वरराव गिऱ्हे, कै. भाऊसाहेब दलाल कै. शालिनीताई वसंतराव माटुरकर, सौ. मिना शालिकराम कुलरकर रौप्य पदक, राजन भवरे जिल्हाधिकारी यांचेकडून संगणक पुस्तक भेट व वाचनालयाकडून स्मृती भेट देवून १२ वी च्या केतकी पदवाड व १० वीच्या हर्षदा परमारे यांचा सत्कार करण्यात आला. मागासवर्गीयातून १२ वी मधून सोनल शहारे व १० वी मध्ये जान्हवी मेश्राम भंडारा शहरात प्रथम आल्याबद्दल कै. बायाबाई पांडुरंग बागडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ रौप्य पदक देवून सत्कार करण्यात आला.१२ व्या वर्गात भंडारा शहरात इंग्रजी विषयात पायल पंचभाई सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल कै. निलकंठराव नानासाहेब कठाळे रौप्य पदक व जीवशास्त्र विषयात कुणाल ज्ञानदेव टेंभुर्णे हिला कै. मनिष चंदेल रौप्य पदक व वाचनालयाकडून स्मृती चिन्ह देवून सत्कार करण्यात आला. अभ्यासिका व संदर्भ विभागाचा लाभ घेवून शासकीय सेवेत रुजू झालेल्या धर्मपाल खोब्रागडे व सुमेध गोस्वामी यांच्यासह एकुण १०४ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. संचालन डॉ. जयंत आठवले व आभार विनोद मेश्राम यांनी केले. (नगर प्रतिनिधी)